जाग आल्यावर सकाळी
बाजुला साराव पांघरुण

तेवढ्या सहजतेनं त्यानं
अंगावेगळ केल मरण

उशाशी ठेवून दिलं नीट
घडी घालून

आणि निघून गेला तो इथून
आपल्या वाटेनं

रात्रभर जिचा
पाहुणा होता तो

आणि जी एका स्वप्नात
गुरफटलेली होती अजून

देवदूतांच्या
व धरणीकंपांच्याच

त्या गुहेची झोपमोड न करता
व निरोपही न घेता

-- अरुण कोलटकर -- भिजकी वही
2 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links