उसकटून टाकलेली दुनिया लेखनातून समोर यावी आणि ती वाचून आपण समृद्ध व्हावं, अशी ही गोष्ट आहे. एखादा घाव बसल्यावर जसं बधीरपण येतं तसं बधीरपण ह्या कथा वाचताना येतं...हे वर्णन आहे समर खडस यांच्या 'बकऱ्याची बॉडी' या कथासंग्रहातल्या कथांचं. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केलेलं. निमित्त 'बकऱ्याची बॉडी'ला बाबुराव बागुल शब्द पुरस्कार मिळण्याचं. तो खडस यांना प्रदान करण्यासाठी नव्या पिढीच्या कथाकार मेघना पेठे मंचावर उपस्थित. 'खोटी नम्रता नसलेला, कुठलाही मुलाहिजा न बाळगता अंगावर येणारा, अस्वस्थ करणारा हा लेखक आहे' यावर पठारे आणि पेठे यांचं एकमत. पेठे लेखकाला 'वांड' असं एक जास्तीचं विशेषण बहाल करतात.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments