मराठी साहित्यविश्वातले ‘ जेफ्री आर्चर ’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ लेखक बाबा कदम यांचं आज कोल्हापुरात वृद्धापकाळानं निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवत होता. त्याच आजारानं त्यांची प्राणज्योत मालवली.

आपल्या कादंब-यांमधून बाबा कदम यांनी जातीव्यवस्था, रुढी-परंपारा यावर हल्ला चढवला होता. तसंच सर्कस, क्रिकेट, वेश्यांचे जीवन, शिकार, गावागावातले संघर्ष हे विषयही सहज हाताळले होते. बाबा एक उत्तम चित्रकार म्हणूनही प्रसिद्ध होते.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links