मुंबई

या उंच हवेल्या ! कां रस्त्यावर पडतां ?
हीं धान्यागारें ! कां तळतळुनी मरतां ?
हीं शीघ्र वाहणे ! रखडत मग का पायी ?
या प्रचंड गिरण्या ! वस्त्र तुम्हा का नाही ?

छे ! नगर नव्हे हें ! हिंदुभूमिच्या शरिरीं
वाटते जहाली जखम भयंकर जहरी;
शेटजी कोठले ? त्यांत किडे लवलवती,
जे शरीर शोषुनि रक्तावरतीं जगती.

जर सूख हिच्यातिल सर्वांसाठीं असते,
ही जखम न असती, भूषण मजला गमतें !

विंदा करंदीकर
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links