क्रेडिट कार्डाचाही विमा उतरविता येतो!

क्रेडिट काडेर् सर्रास हरवतात किंवा चोरीला जातात. त्यांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जातो. बऱ्याच जणांकडे तीन-चार बँकांची क्रेडिट काडेर् असतात. कार्ड हरवल्याचे बऱ्याच उशिरा लक्षात येते, तेही जेव्हा बँकेकडून भल्या मोठ्या रकमेचे बिल येते त्यावेळी! अशावेळी मोठा आथिर्क फटका बसतो. बरीच धावाधाव करावी लागते. पुढील गैरवापर टाळण्यासाठी बँकेला लगेच कळवावे लागते. अशावेळी कार्डाचा नंबर माहीत नसल्यास आणखी कटकटी वाढतात. कार्ड हरविल्याचे कळवण्यापर्यंत झालेल्या गैरवापराला बँक जबाबदार राहत नाही.

क्रेडिट कार्ड हरवल्यास वा चोरीला गेल्यावर या सर्व कटकटींतून सुटका करण्यासाठी इंग्लंडच्या 'सीपीपी' ग्रुपने आपली सेवा भारतात उपलब्ध केली आहे. 'सीपीपी' म्हणजे क्रेडिट प्रोटेक्शन प्लॅन. या कंपनीचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. ही सेवा दिवसाला दोन ते चार रुपये खर्च केल्यावर मिळू शकते. कंपनीने २४ तास चालू असणारी टोल फ्री हेल्पलाइनही (फोन नंबर ६०००-४०००) सुरू केलेली आहे.

दोन प्रकारच्या सेवा आहेत. एक 'क्लासिक' व दुसरी 'प्रीमियम'. व्यक्तिगत कार्डधारकास 'क्लासिक'साठी वर्षाला ९९५ आणि 'प्रीमियम'साठी १२९५ रुपये सभासद फी द्यावी लागते. संयुक्त कार्डधारकांना 'क्लासिक'साठी १४९५ रुपये आणि 'प्रीमियम'साठी १९४५ रुपये मोजावे लागतात.

एकाच व्यक्तीकडे तीन ते चार काडेर् असली तरी सर्व कार्डांना संरक्षण मिळते. प्रत्येक कार्डासाठी वेगळी रक्कम द्यावी लागत नाही. टोल फ्री नंबर फिरवून आपल्याला कुठली योजना हवी आहे, हे कळवावे. त्याची फी क्रेडिट कार्डाद्वारे भरावी. सभासदत्वाच्या नोंदणीसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना येतो. तो संपूर्ण भरून कंपनीकडे लगेच पोस्टाने पाठवावा.

क्रेडिट कार्डासमवेत पॅनकार्ड, पासपोर्ट इत्यादीसाठीही विम्याचे संरक्षण घेता येते. कार्ड हरवताच 'सीपीपी' कंपनीस फोन करून कळविल्यास पुरेसे आहे. प्रवासात असताना देशात किंवा परदेशात कार्ड हरवले तर 'सीपीपी'तफेर् तुमच्या तिकिटाचे पैसे तसेच हॉटेल बिल भागविण्यासाठीचीही व्यवस्था केली जाते. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित घरी परतू शकता. प्रवासात तुमचा पासपोर्ट हरवला तर कंपनीकडून तुम्हाला भारतीय दूतावासाचाही पत्ता, फोन नंबर इत्यादी आवश्यक माहिती लगेच पुरविली जाते. 'प्रीमियम' कार्ड तुम्ही घेतले असेल तर भारतात २० हजार रुपयांपर्यंत खर्चासाठी रोख रक्कमही कंपनी देते. भारतात आतापर्यंत सिटी बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, एच.एस.बी.सी. बँक व कोटक महिंद बँक या चार बँकांनी 'सीपीपी' कंपनीशी करार केला आहे. अधिक माहिती कंपनीच्या www.cppindia.com या वेबसाइटवरही मिळू शकते.

........

संकटकाळातील अमूल्य मदत

क्रेडिट कार्ड समवेत पॅनकार्ड, पासपोर्ट इत्यादीसाठीही विम्याचे संरक्षण घेता येते. कार्ड हरवताच 'सीपीपी' कंपनीस फोन करून कळविल्यास पुरेसे आहे. प्रवासात असताना देशात किंवा परदेशात कार्ड हरवले तर 'सीपीपी'तफेर् तुमच्या तिकिटाचे पैसे तसेच हॉटेल बिल भागविण्यासाठीचीही व्यवस्था केली जाते.
........
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links