शाब्दीक अर्थ - न संपणारि तिसरी (ह्या अर्थातुन काहीच अर्थ निघत नाहि :))
खगोलशास्त्रिय अर्थ - शुध्द पक्षातिल तिसरी तिथि ज्या रात्री चंद्राच्या पधंरा दिवसांच्या प्रवासातिल तिसरी कोर दिसते.
भावूक किंवा धार्मीक अर्थ - हिंदु पंचागानुसार अतिशय शुभ असा दिवस, ह्या दिवशी बरीच श्रध्दाळू जी श्रिमंत सुध्दा आहेत सोन, चांदि खरेदि करतात.
व्यापारांसाठि अर्थ - अर्थ जमा करण्यासाठि उत्तम असा दिवस
ऐतिहासीक अर्थ - विष्णुचा सहावा अवतार परशुरामाचा जन्म दिवस
पौराणिक अर्थ - आजच्या दिवशी स्वर्गलोकातुन गंगा नदी प्रुथ्वीवर अवतरली

मराठिकट्ट्यावर सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. सोन खरेदि करुन आजचा दिवस साजरा करता नाहि आला तर भाविकांनी भाजिमार्केट मधे इतर कुठलिही मौल्यवान वस्तु खरेदि करण्याचा विकल्प करावा.
5 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links