माखनचोरांचे लाड पुरविणा-या गोकुळाचा मान दहीहंडी उत्सवानिमित्त ठाण्याला केव्हाच मिळाला आहे. रविवारी या गोकुळात दाखल होणाऱ्या गोविंदांसाठी जय्यत तयारी सुरू असून १ लाखांपेक्षा अधिक बक्षिसाची रक्कम असलेल्या तब्बल १८ दहीहंड्या या गोकुळात उभारल्या जाणार आहेत.
शहरातील सुमारे २५० हंड्यांमध्ये तब्बल एक कोटी रुपयांचे दही असून ते लुटण्यासाठी गोविंदा पथकांचे प्लॅनिंग सुरू आहे. यंदाचा हा उत्सव अभूतपूर्व करण्यासाठी आयोजक गेल्या दोन दिवसांपासून रात्रीचा दिवस करून मेहनत घेत आहेत.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links