`दैनिक आपला वार्ताहर'च्या १८ जून रोजीच्या अंकातील अग्रलेख :
गडकरी रंगायतनमध्ये बाँबस्फोट घडवल्याप्रकरणी अटक झाली. अटक झाली नी सारे समाजवादी, सेक्युलॅरिझमवाले, लालभाई हे हिंदुत्ववाद्यांवर तुटून पडले. `बघा बघा ! हे हिंदुत्ववादी बघा ! दहशतवादी हे ! आतंकवादी सैतान. यांच्यापासून देशाला, समाजाला, कायदा-सुव्यवस्थेला भीषण धोका. यांची नांगी ठेचा. यांचे फणे ठेचून काढा. हिंदुत्ववाद्यांना उखडून टाका. यांच्या संघटनांवर बंदी घाला', अशा बोंबा मारल्या जाताहेत. कुणीही कुठल्याही कोपर्यातून उठतो नि सरळ हिंदुत्ववाद्यांवर तोंडसुख घेतो. बाबरी पतनासाठी सगळया भूतकाळाच्या खपल्या खाजवतो. राजकारण्यांपासून ते नाटकवाल्यांपासून नि पत्रकबाज समाजसेवकांपर्यंत सगळीकडे हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात आगपाखड चालली आहे. अख्ख्या हिंदुत्ववादाला आरोपीच्या पिंजर्यात टाकण्याची नव्हे तर थेट फासावरच लटकवण्याची मांग केली जात आहे.
पण कुणीही या प्रकरणी सारासार विचार करतांना दिसत नाही. असे का घडले ? कारण काय ? याचा परिणाम काय ? यातून कसल्या धोक्याचे निदर्शन ? काळाची गरज काय सांगते - काय दर्शवते ? याबाबत कसलेही विचारमंथन नाही.
त्या कार्यकर्त्यांनी हे बेकायदेशीर दहशतीचे कृत्य का केले ? त्या कार्यकर्त्यांनी याचे कारण पुढीलप्रमाणे सांगित
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments