माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात वाचनसंस्कृती लयाला जात असल्याची ओरड होत असताना या माहिती-तंत्रज्ञानाच्या अश्वावरच आरूढ होत वाचनसंस्कृती जगवण्याचे प्रयत्न जगभरात होत आहेत. ऑनलाइन बुक्स, मॅगझिन्सची संकल्पना त्यातूनच पुढे आली. पण मराठीत याबाबत म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत. वाचकांना घरपोच पुस्तके पोहोचवणाऱ्या ठाण्याच्या 'वाचू आनंदे' या आगळ्यावेगळ्या लायब्ररीच्या संचालिका रेवती गोगटे आता वेबसाइटच्या माध्यमातून पुस्तकांना वाचकांपर्यंत पोहोचवणार आहेत.
www.ireadindia.com असे या वेबसाइटचे नाव आहे. सहा वर्षांपूवीर् रेवती गोगटे व त्यांचे पती वसंत गोगटे यांनी 'वाचू आनंदे' या घरोघरी पुस्तके पोहोचवणाऱ्या लायब्ररीची ध्वजा रोवली. आता गोगटेंनी त्यापुढे एक पाऊल टाकत ऑनलाइन लायब्ररीची सुरुवात केली आहे. संग्रहातील तब्बल १७००हून अधिक पुस्तके, त्यांचे मुखपृष्ठ, लेखकाचे नाव, पुस्तकाचा थोडक्यात सारांश, पुस्तकाचा ओळख क्रमांक अशी विस्तृत माहिती त्यावर असेल. पुस्तकाची साहित्यप्रकारानुसार सत्याधारित, कादंबरी, कथासंग्रह, आत्मचरित्र, संपादित, वैचारिक, कविता, प्रवासवर्णन, रसग्रहण, ऐतिहासिक, व्यक्तिचित्रे, नाटक, ललितलेख अशी विभागणी करून लिस्टिंग करण्यात आले आहे. एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंगमध्ये एमएस केलेल्या सौरभ गोगटे या त्यांच्या मुलाने आपल्या मित्रांसह ही वेबसाइट तयार कली आहे.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments