राज्यात अकरावी प्रवेशासाठी एसएससीच्या विद्यार्थ्यांना ९० टक्के कोटा लागू करणारी सरकारी अधिसूचना (जीआर) अखेर गुरुवारी जारी झाली.

त्यानुसार सीबीएसई, आयसीएसईसह इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांसाठी दहा टक्के जागा राखीव असतील. या निर्णयाचे राज्यातील लाखो विद्याथीर्-पालकांनी स्वागत केले आहे.

सीबीएसई, आयसीएसई बोर्डांच्या उदार गुणदानाचा फटका एसएससीच्या विद्यार्थ्यांना बसतो आहे. त्यांच्यावरील हा अन्याय दूर करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी लाखो विद्याथीर्-पालक करीत होते.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links