Ekhadi spardha jinkane kiva ekhadi pariksha changlya markane uttirna hone he jitke kautukaspadh ahe titkech ji mule kathin paristitit sudha khachun na jata ziddi ne ashya spardhena samore jatat tyanche vishesh kautuk karayla have.Karan hi mule majhya drushteene kharya arthane sarvanach prerana denari ahet.

Spardha jinkanya adhi nikalachi farshi chinta na karta je palak aplya mulanvar tyala ziddi ne ,mehenatine samore jayacha saunskar kartat ti mule shaley parikshetech nahi tar ekendar ayushyat yenarya pratek parikshela asech dhairyane samore jaatat yat shankanahi.

Ashach don mulanche kautuk karavesa vatte.

प्रणव सेठ -83%

दहावीच्या भूमितीच्या पेपरला काही तास उरले असतानाच अचानक पोटात दुखू लागल्याने प्रणव सेठ या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले होते. त्याचे तातडीने अॅपेंडिक्सचे ऑपरेशन करावे लागले. शुद्धीवर आल्यावर प्रणवने परीक्षेला बसण्याचा हट्ट धरला. तो पुरवण्यासाठी डॉक्टरांच्या परवानगीने प्रणवच्या नालासोपाराच्या परीक्षा केंदावर अॅम्ब्युलन्स नेऊन त्यातच सहायकाच्या मदतीने पेपर लिहू देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई बोर्डाच्या सचिव बसंती रॉय यांनी घेतला होता. याची बातमी मटात आल्यानंतर प्रणवसोबत बोर्डाचेही कौतुक झाले. गुरुवारी लागलेल्या दहावीच्या निकालात प्रणवने बोर्डाचा विश्वास सार्थ ठरवत ८३ टक्के मिळवले. ऑपरेशननंतर काही तासात दिलेल्या भूमितीच्या पेपरमध्येही प्रणवने ६० पैकी ५४ गुण मिळवले. प्रणवचे हे यश साऱ्या कुटुंबासाठी विशेष आहे. प्रणवचा आम्हाला अभिमान असल्याचे त्याचे वडील गौरांग सेठ म्हणाले.

मनाली -९६.४६ %

दोन्ही पायांमध्ये जन्मत:च दोष असणाऱ्या मनालीने 'अपंगत्व' हा शब्द आयुष्यातून केव्हाच पुसून टाकला आहे हे तिच्याशी बोलताना जाणवते. याचेच फळ म्हणजे तिने ९६.४६ टक्के गुण मिळवले. स्वत:ला कुठल्याही सवलती न देणे हे तिचे पहिले तत्त्व. आत्मविश्वास हीच तिची सगळ्यात मोठी ताकद आणि दुसरी ताकद आई-वडील. ९० टक्क्यांच्या खाली न येण्याचा निर्धार कधीही सोडला नाही.

Bravo Manali and pranav !!!
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links