मुंबईतील नामवंत पदवी कॉलेजांपैकी एक तृतियांशपेक्षा जास्त कॉलेजे ही अल्पसंख्याक संस्थांची असल्याने खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी कमी जागा उरत असल्याचे चित्र आहे. त्याचा मोठा फटका जास्तकरून मराठी विद्यार्थ्यांना बसणार असून पदवी कॉलेजांचे प्रवेश त्यांच्यासाठी अधिकच कठीण होणार आहेत.

मुंबई परीसरात आर्टस, कॉमर्स आणि सायन्स असे पारंपरिक कोसेर्स असलेल्या पदवी कॉलेजांची एकूण संख्या १५४ एवढी आहे. त्यापैकी २८ कॉलेजेस एसएनडीटी विद्यापीठाची, म्हणजेच केवळ विद्यार्थिनींसाठी राखीव असल्याने खुल्या वर्गातील प्रवेशासाठी १२६ कॉलेजेस उरतात. त्यांच्यापैकी तब्बल ५४ म्हणजेच एक तृतियांशपेक्षा जास्त कॉलेजे अल्पसंख्याक संस्थांची आहेत. या संस्थांतील पन्नास टक्के जागा त्या त्या अल्पसंख्याक समाजासाठी राखीव असतात.
2 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links