भारतात माहिती-तंत्रज्ञानाचा प्रसार झाला असला तरी शैक्षणिक कामासाठी मात्र अजूनही जुन्या साचेबद्ध पद्धतीचा वापर करतो, अशी टीका नॅशनल नॉलेज कमिशनचे अध्यक्ष सॅम पित्रोडा यांनी केली. इंडियन मर्चंटस चेंबर आणि नॉलेज कमिशन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारावर पित्रोडा यांनी सही केली. त्यानंतर त्यांनी ते बोलत होते.
एक दिवसाच्या मुंबई भेटीवर आलेल्या पित्रोडा यांनी आयएमसीच्या सभासदांना नॉलेज कमिशनचे महत्त्व आणि कार्य विषद केले! 'भारतात एकीकडे अनेक उद्योगांसाठी लायक माणसे मिळत नाहीत तर एकीकडे बेरोजगारी दिवसेंदिवस वाढतेच आहे. ही दरी मिटवण्यासाठी अधिकाधिक विद्यापीठे, शैक्षणिक संस्था निर्माण व्हायला हव्यात, असे मत पित्रोडा यांनी मांडले.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links