'नो टू बेंगळुरू... येस टू बफेलो' हा नवा मंत्र उच्चारत अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकी अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्यासाठी आऊटसोर्सिंगविरोधी कार्यक्रमच जाहीर केला असून भारतातील १० लाख आयटी व्यावसायिक आणि बीपीओ उद्योगाला त्याचा जबर फटका बसण्याची भीती आहे.
व्हाइट हाऊस येथे सोमवारी नवे करविषयक धोरण जाहीर करताना ओबामा यांनी त्या आश्वासनाची पूर्ती करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यामुळे ज्या अमेरिकी कंपन्यांनी आपल्याकडील नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग केले आहे त्यांना यापुढे कोणतीही करसवलत मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यातून पुढील १० वर्षांत २१० अब्ज अमेरिकन डॉलरची बचत होईल, असा दावा ओबामा यांनी केला.
1 Comment   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links