'आपल्या राज्यात नव्याने उभारल्या जाणा-या उद्योगांतील नोक-या स्थानिकांनाच प्राधान्याने दिल्या जाव्यात. बाहेरून... विशेषत: बिहारमधून येणा-यांनी त्या बळकाव्यात, असे घडता कामा नये', हे उद्गार राज ठाकरे किंवा ठाकरे घराण्यातील कोणाचे नसून मध्य प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आहेत!

गुरुवारी सतना येथील कार्यक्रमात चौहान यांनी हे वक्तव्य केले आणि अर्थातच, लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान या बिहारी नेत्यांचा संताप ओढवून घेतला.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links