पावसासाठी आशेने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या राज्यातील लोकांवर एक तास वाढीव लोडशेडिंगची वीज गुरुवारी कोसळली.

विजेचा तुटवडा ५२०० मेगावॉटवर गेल्याने मोठ्या शहरांत पावणेसहा ते आठ तास, मध्यम शहरांत आठ ते साडेनऊ तास, तर ग्रामीण भागात १४ तास इतका वेळ अंधारयात्रा लोकांना घडणार आहे. ही घोषणा होत असतानाच राज्यभर पावसाने हजेरी लावल्याने लोडशेडिंगला आळा बसण्याची आशा आहे.

राज्यातील विजेची सध्याची मागणी १४ हजार २०० मेगावॉट असून उपलब्धता ९ हजार मेगावॉट इतकीच आहे. या अभूतपूर्व वीजटंचाईमुळे लोडशेडिंग वाढवण्याबरोबरच आपल्या अखत्यारीतील सर्व होडिर्ंग्ज पुढील १५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links