गणेशोत्सव काळात मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांनी मशिदीतून दगडफेक करून दंगल माजवणे हे हिंदूंना आता नवीन नाही. या वर्षी गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत मरोळ आणि अमळनेर येथे मुसलमानांनी मिरवणुकीवर आक्रमण केले, तर मिरज येथे अफझलखान वधाच्या कमानीला विरोध करत धर्मांध मुसलमानांनी दंगल केली. तीत त्यांनी पाच गणेशमूर्तींची विटंबना केली. नंग्या तलवारींनी आणि दगडफेक करून हिंदूंवर आक्रमण केले; मात्र या धर्मांध मुसलमानांना रोखण्याऐवजी त्यांना प्रत्यूत्तर करणार्या हिंदूंवर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला. अशा प्रकारे काँग्रेस शासनाच्या काळात पराक्रमी शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास शिवरायांच्या महाराष्ट्रातच सांगण्यास आणि चित्ररूपाने दाखवण्यास गुन्हा ठरला आहे. याविषयी `दैनिक सामना'च्या कालच्या संपादकीयातून परखडपणे झोड उठवली. हा आग्रलेख आमच्या वाचकांसाठी देत आहोत.
नाव शिवरायांचे आणि कारभार मोगलांचा !
काय चाललेय या शिवरायांच्या महाराष्ट्रात ? नाव शिवरायांचे आणि कारभार मोगलांचा. हुकूम अफझलखान आणि औरंगजेबाच्या पिलावळीचा. गणेशोत्सव विसर्जनाचा मोका साधून खानांच्या पिलावळीने सांगलीतील मिरजेपासून ते मुंबईतील मरोळपर्यंत जो नंगानाच घातला आहे, तो काळजाचा थरकाप उडविणारा आहे.
मरोळ आणि अमळनेर येथे गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर मुस्लिमांनी दगडफेक केली. मशिदीवरून मिरवणूक जातांना वाद्ये वाजली म्हणून मशिदीतून दगडफेक झाली. मरोळ येथे या घटनेने वातावरण तापले. तणाव निर्माण झाला. पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. गणेशभक्तांनी संयम पाळला; पण शांतता प्रस्थापित होताच पोलिसांनी गणेशभक्तांना अटक करून खटले दाखल केले. हा कसला न्याय ? हे कुणाचे लांगुलचालन ? आणि कोणाच्या इशार्यावरून हे सर्व चालले आहे ? मशिदीतून श्रींच्या मूर्तीवर दगड भिरकावणारे हात मोकळेच आहेत. हिंदूंच्या बाबतीत `मारो-काटो'च्या बांगा देणारी थोबाडे त्यांच्या विखारी जिभांसह अद्यापी वळवळत आहेत. प्रश्न इतकाच आहे की, गणेशमूर्ती विसर्जनातील वाद्याने मशिदीतील अल्लास त्रास होतो, भावना दुखावतात. मग मशिदीवरील बेकायदा भोंग्यांवरून पहाटे चार वाजल्यापासून जी बांग दिली जाते ते तमाम हिंदू आणि मंदिरातील देव-देवतांसाठी अंगाई गीत असते काय ? तुमच्या भावना दुखावतात म्हणून तुम्ही हाती दगड आणि नंग्या तलवारी घेता कारण तुम्हाला अल्पसंख्याक म्हणून सरकारचे संरक्षण आहे; मात्र हिंदूंना स्वसंरक्षणासाठी आणि प्रतिकारासाठीही हात उचलण्याचा अधिकार नाही. प्रतिकारासाठी उचललेला त्याचा हात मुळापासून उखडला जातो हाच इथला मोगली कायदा आहे. जे मरोळला झाले, तेच अमळनेरला झाले आणि त्याहीपेक्षा भयंकर सांगली जिल्ह्यातील मिरजेत झाले. गणेशोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीवरील `अफझलखान वधा'च्या चित्रावर काही धर्मांध मुस्लिमांनी आक्षेप घेतला. शहरातील पाच गणेशमूर्तींची विटंबना केली. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला हे चित्र आक्षेपार्ह, मुस्लिमांच्या भावना दुखावणारे आहे, असे ठरवून पोलिसांनी हे चित्रच जप्त केले आणि यानिमित्ताने प्रचंड दंडुकेशाही करून आपणही खानाच्या अवलादीचेच असल्याचे दाखवून दिले आहे. मोगलांनी मंदिराबाहेर मांस फेकले, मूर्ती तोडल्या, त्यांची विटंबना केली, हिंदूंच्या नावाने बोंबा ठोकल्या. शाहिस्तेखान आणि अफझलखानानेदेखील हे सर्व केले म्हणून शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचे आणि अफझलखानाचा कोथळा काढण्याचे पवित्र कार्य शिवाजी महाराजांनी केले. हा इतिहास आहे. महाराष्ट्राचे सरकार आणि त्यांचे पोलीस हा इतिहास कसा बदलणार ? अफझलखान हा स्वराज्याचा शत्रू होता म्हणून महाराजांनी त्यास मारले. शिवाजी राजे मोगली शत्रूंना फक्त पोकळ इशारे अन् धमक्या देत बसले नाहीत. हिंदुस्थानचे सरकार आज ज्याप्रमाणे पाकड्यांना इशारे देत दिवस काढते आहे, तसे शिवाजी राजांनी केले असते, तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या आमच्या उंबरठ्यापर्यंत आल्या असत्या आणि आपल्यालाही `शिरकुर्मा' तोडीत नमाज पढावा लागला असता. हिंदु धर्म आणि महाराष्ट्रावरील हल्लेखोरांचा कोथळा काढून महाराजांनी तुमच्या आमच्या पिढ्यान् पिढ्यांचे रक्षण केले आहे.
कॉ. डांगे यांनीही म्हटले आहे, `अफझलखान वधावर इतकी चर्चा का करता ? अरे, ही चर्चा कशाला पाहिजे ? मारला! स्वराज्यासाठी मारणे आवश्यक होते म्हणून मारला ! त्यात काय बिघडले ? `छत्रपती शिवाजी राजे कसलेले राजकारणी होते. त्यांचे चरित्र म्हणजे सर्वस्वी राजकारणच आहे!' परंतु इतरांचा इतिहास आणि शिवाजी राजांचा इतिहास यात फरक आहे. इतरांचे इतिहास इतिहासजमा झाले, शिवरायांचा इतिहास अजून कामाला येतो! म्हणूनच आपण अद्यापी `शिवजयंती' साजरी करतो आणि प्रेरणा यावी म्हणून `शिवाजी महाराज की जय' म्हणतो. प्रतापगडाचेच उदाहरण घेतले, तर प्रतापगडाखालचे अफझलखानाचे थडगे अद्यापी अनेकांना सतावते हेही दिसते! इतरांचे इतिहास `इतिहासात असे घडले' एवढेच सांगतात; पण शिवरायांचा इतिहास `असे घडायला पाहिजे आणि असे घडवा' हे सांगतो. हेच त्याचे वैशिष्ट्य! म्हणून शिवरायांचा इतिहास हा जिवंत राजकारणाचा विषय आहे! अफझलखानाचा वध हे तर इतिहासातले धगधगते प्रकरण आहे. तो इतिहास कसा पुसणार ? या इतिहासाचे कितीही कोथळे काढले तरी तो इतिहास भावी पिढ्यान् पिढ्यासाठी प्रेरणाच देत राहील.
इतिहास बदलता येणार नाही
महाराष्ट्रातील जातीय `मराठा' संघटना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना नेहमीच टीकेचा विषय करीत असतात; पण बाबासाहेबांनी `राजा शिवछत्रपती' या नावाने दहा खंड लिहून महाराष्ट्रावर उपकार केले आहेत. त्यांच्या तिसर्या खंडात अफझलखानाच्या कोथळ्याचे प्रकरण सर्व ऐतिहासिक पुराव्यानिशी मांडले आहे. मराठी स्वराज्याचा अंमल शिवछत्रपती महाराष्ट्रात जेव्हा झपाट्याने प्रस्थापित करू लागले, तेव्हा विजापूरच्या आदिलशाही राजवटीने शिवाजीचा नायनाट करण्यासाठी प्रचंड सैन्य आणि युद्ध साहित्य देऊन अफझलखानाची रवानगी केली. हर उपायाने मराठ्यांचा राजा शिवाजीला दगा करून ठार मारण्याचा हुकूम त्याला देण्यात आला. हा अफझलखान विजापुराहून निघाला तो तुळजापुरावर आला. तेथे मराठ्यांची जी कुलस्वामिनी तुळजाभवानी तिच्या मूर्तीवर घणाचे घाव घालून तिचा त्याने चुराडा केला. पंढरपुरातही देवस्थानाची त्याने अशीच नासधूस केली. अफझलखान स्वत:ला `मूर्ती आणि मूर्तिपूजकांचा विध्वंसक\' म्हणवून घेत असे. शिवछत्रपतींच्या घराण्याचा तो मोठा द्वेष्टा होता. त्यांचे सख्खे थोरले भाऊ संभाजी राजे यांना कर्नाटकातील कटकगिरीच्या वेढ्यात अफझलखानाने कपटाने ठार मारविले होते. शिवाजी राजांचे वडील शहाजी राजे यांना एकदा हाता-पायात बेड्या घालून विजापूरच्या रस्त्यातून अफझलखानाने अपमानास्पद रीतीने फिरविले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांना ठार मारण्याची ही कामगिरी अफझलखानाने मोठ्या उत्साहाने पत्करली. अशा अफझलखानाच्या बाबतीत शिवाजी महाराजांनी काय करायला हवे होते ? `यावे यावे खानसाहेब, आपण महाराष्ट्रात आलात, तुळजाभवानीची मूर्ती तोडलीत, पंढरपूरचा विध्वंस केलात हे उपकारच झालेत. `मराठी' जनतेच्या वतीने आम्ही तुमचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करीत आहोत', असे राजांनी सांगायला हवे होते काय ? अफझलखानास बरे वाटावे म्हणून महाराजांनी स्वत:चाच कोथळा काढून काँग्रेसच्या `व्होट बँके'स खूश करायला हवे होते काय ? खान हा स्वराज्याचा शत्रू होता म्हणून तो मारला. त्याला मारला नसता तर महाराष्ट्राच्या राजाला दगाफटका झाला असता, असे इतिहास सांगतो. इतिहास असा बदलता येणार नाही. समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव यांना जसे इतिहासात स्थान आहे तसे अफझलखानाच्या कोथळ्यासही आहे. शनिवारवाड्यासमोर आचार्य अत्रे यांनी एकदा सांगितले आहे. अफझलखानाचा वध करून शिवरायांनी एक महान संदेश या राष्ट्राला कायमचा देऊन ठेवलेला आहे. तो हा की, अफझलखानाप्रमाणे जेव्हा कोणतेही संकट या देशाच्या स्वातंत्र्यावर आणि हिंदु धर्मावर येईल तेव्हा त्या संकटाचा `कोथळा' आपल्या प्रखर वाघनखांनी काढणे यातच या राष्ट्राच्या शिवशक्तीची खरी कृतार्थता आहे! मिरजेत जे घडले ते भयंकर आहे. शिवरायांचा अपमान आहे. मुंबईच्या अरबी समुद्रात शिवरायांचा पुतळा उभारण्याचे राजकीय नाटक करता आणि मिरजेत शिवरायांच्या इतिहासाचा कोथळा काढता ? अरबी समुद्रातील स्मारक दालनातही अफझलखान कोथळ्याचे चित्र लावावेच लागेल. आमचे तमाम शिवप्रेमींना आवाहन आहे, अफझलखान वधाच्या प्रतिकृती सर्वत्र लावा आणि शिवरायांचा इतिहास धगधगता ठेवा.
`दैनिक सामना'चे आवाहन
आमचे तमाम शिवप्रेमींना आवाहन आहे, अफझलखान वधाच्या प्रतिकृती सर्वत्र लावा आणि शिवरायांचा इतिहास धगधगता ठेवा.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments