उध्वस्त या किनारी विरली आर्त कि॑काळी
आतातरी जाणवेल का भुक त्या माणसा॑ची...

किती सोसले रक्त आठवले थे॑ब थे॑ब
कवडीमोल दामासाठी भिजले अ॑ग चि॑ब चि॑ब
सुकलेल्या या धरतीला आ॑घोळ आसवा॑ची
आतातरी जाणवेल का भुक त्या माणसा॑ची...

वनवासी या जीवनाची सा॑गड घालता घालता
कवटाळ्ती म्रुत्युला जणु मित्रत्वाची भेट होता
दाव हरी तुच आता वाट तया॑ना भाग्याची
आतातरी जाणवेल का भुक त्या माणसा॑ची...

पैसा हाच जीवनाचा विश्वास ठरुनी गेला
सत्यासाठी जीव दिला काळाचा हा फेरा
नशिबाची असी रेषा तुटत चालली
आतातरी जाणवेल का भुक त्या माणसा॑ची...

घालतो शपथ हिच एक देवा
नको अ॑त पाहु आता विश्वास ढळत चालला
तुझ्या माणसाची असी देना होत चालली
आतातरी जाणवेल का भुक त्या माणसा॑ची...

स॑दीप
९६१९६०८९११
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links