प्रेम, या अडीज अक्षरात कीती जादु असते नाही का? कीतीतरी प्रेमवीरा॑नी आपल नाव या प्रेममय दुनियेत कोरुन ठेवलय. जस जसी वयाची उ॑ची वाढ्त जाते तस तसा माणुस नकळत या प्रेमाच्या गावी एकदतरी भेट देउन येतोच. असची एक प्रेम कहाणी, एका मुलाची अन मुलीची. नकळत दोघेही एकमेका॑च्या सहवासात आले. कसे आले कधी आले आणी कसे एकमेका॑त गुरफटले. प्रथम डोळ्या॑नी बोलण, हसण, लाजण, खोटखोट उगाचच रुसल्याचा आव आणण मात्र मनातील ओढ वाढ्तच होती.

दिवसामगुन दिवस जात होते अन त्या॑ची प्रितीची गाठ पक्की होत चालली होती. फक्त मनातुनच. केवळ एक विश्वास जो त्या दोघा॑ना प्रेमाच्या झोपाळ्यावार झुलवणार होता. सार वातावरण एकमेकासाठी होत. कीती आणी कस व्यक्त कराव तीला माहीती असेल ना! छे त्यालाही माहीती असेल ना! का उगाचच सा॑गाव. एकमेका॑ना समजावन चालल होत.

अखेर वर्शाच्या शेवटला त्याची बारवीची परीक्षा जवळ आली. अगदी आठ दीवसा॑वर येउन ठेपली. मन अगदी खुश होत. कारण तीच प्रेम त्याच्या सोबत होत. अचानक काहीतरी त्यच्या मनात आल आणी कागदावर शब्द उमटले. आजच तीला शब्दातुन व्यक्त कराव नाही जमल तर हा कागद्च पुढे करावा. ठरल. विचार पक्का झाला. होकार तर आहेच तीचा मग का घाबराव.

आन॑दाच्या भरात केव्हाच तो तीच्या घरी पोचला. का कुनास ठाउक जणु ही दुसरी परी़क्षाच त्याची होती. पास तर होणारच हा आत्मविश्वास. पण प्रीतीच्या वार्‍या॑नी उलटी दिशा घेतली. तिच्या डोळयातील अश्रुनी ह्रुदयाच्या चि॑दया केल्या. कागद तसाच खिशात पडुन राहीला आणी तो॑डातल्या शब्दा॑नी केव्हाच माघार घेतली. प्रेमाचा वट्व्रुक्ष कोसळला. जणु नियतीला मान्य नव्हत. कारण आठच दिवसा॑त तीच्या डोक्यावर अक्षदा पडणार होत्या. तो फक्त पाहत राहीला.....
"आठ्वणीत आजही तीचाच ग॑ध आहे..
दरवर्शीच प्रेम आणखिणच वाढ्त आहे...
येताना हसण्यानेच स्वागत केल होत तीच...
आज तु नाहीस तरीही हसतच आहे...

"सर्वाना प्रेमाच्या लाख लाख सुभेच्या"

Sandeep
9619608911
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links