स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता अत्यंत क्रूर अत्याचार होत असतांनाही छत्रपती संभाजी राजे यांनी धर्म बदलला नाही. धर्म बदलणे म्हणजे आत्मा विकणे. टिपू बळाचा वापर करून जबरदस्तीने धर्मांतर करण्यात कुख्यात होता. त्याचा पराभव करणारे मराठ्यांचे सेनापती हरिपंत फडके यांनी टिपू लढाईत हरल्यानंतर भेदरलेल्या त्याच्या मुलाला जवळ घेऊन धीर दिला. त्याचे धर्मांतर करण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. धर्मावर आघात झाला, तरच हिंदु धर्माच्या रक्षणासाठी बळाचा वापर करतात, धर्म वाढवण्यासाठी नव्हे. ओरिसामध्ये वनवासींच्या आत्म्यांचे रक्षण करण्यासाठी विश्‍व हिंदु परिषद धडपडत आहे; परंतु करण थापर यांच्यासारखे हिंदूंच्या आत्म्यांचे दलाल मात्र वनवासींचे आत्मे ख्रिस्त्यांना विकून विहिंपला वनवासाला पाठवण्याची इच्छा बाळगत आहेत. करण थापर यांच्यासारख्यांचा शासनाने ताबडतोब बंदोबस्त करावा !



लेखक : ज्येष्ठ पत्रकार
श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी

छ. संभाजी राजे आणि हिंदु धर्माभिमान !
हिंदुस्थान टाइम्सच्या ३१ ऑगस्टच्या अंकातील करण थापर यांच्या `हू इज दि रियल हिंदू' या लेखातील पहिल्या तीन परिच्छेदांचा समाचार गेल्या लेखात आपण घेतला. मला माझा आत्मा विकायचा असेल, जुने देव काढून त्या स्थानी नवे देव आणायचे असतील, तर तुम्ही मला विचारणारे कोण, असा प्रश्‍न श्री. थापर यांनी विचारला होता. माणूस पारतंत्र्यात असतो, तेव्हा अनेक वेळा आत्मा विकून दिवस काढावे लागतात. माणूस स्वतंत्र होतो, तेव्हा त्याचा आत्मा सुरक्षित रहातो. मोगलांच्या काळात आणि ब्रिटीश राजवटीत सर्वांत मोठा आघात हिंदूंच्या आत्म्यावर झाला. एका लढाईत पराभव होऊन भूमी सोडावी लागली, तर दुसर्‍या लढाईत विजयी होऊन गेलेली सर्व भूमी परत मिळवता येते; परंतु आपल्या पत्‍नीवर बलात्कार होतो, आपल्या तोंडात गोमांस कोंबले जाते, मुलांना भिंतीत चिरडून मारले जाते, तेव्हा आत्म्यावर होणारे आघात कधीही पुसले जात नाहीत. तू मुसलमान होतोस का, असा प्रश्‍न औरंगजेबाने संभाजीला विचारला, तेव्हा खरे म्हणजे `तू मला तुझा आत्मा विकत देतोस का', असा प्रश्‍न त्याला संभाजीला विचारायचा होता. संभाजी जर हो म्हणाला असता, तर वाटेल त्या भावाने औरंगजेबाने त्याचा आत्मा विकत घेतला असता; पण आत्मा ही विकायची वस्तू नाही, असे संभाजीला जगाला दाखवून द्यायचे होते. त्यांनी आपले डोळे फोडून घेतले, जीभ कापून घेतली, औरंगजेबाने त्यांची व्रतडी सोलून काढली; पण संभाजीने आपला आत्मा विकला नाही. आपण हिंदु असतांना जीव वाचवण्यासाठी मुसलमान धर्माचा स्वीकार करणे म्हणजे आत्मा विकणे होय, असे संभाजीला वाटले. आपल्या अस्मितेचा त्याग करणे म्हणजे आत्मा विकणे होय. सर्वसाधारणपणे आपण ज्याचा त्याग करत नाही, ते बळाने वा प्रलोभनाने सोडून देणे म्हणजे आत्मा विकणे होय. ज्यांना आपण आत्मा विकणार आहोत, ते लोक आपल्या वाईटावर आहेत, हे माहीत असतांनाही त्यांना आपला आत्मा विकण्याची पाळी येणे, यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट जगात नाही, असे हिंदु मानतो.

धर्मावर जेव्हा घाला आला, तेव्हाच त्याच्या रक्षणार्थ हिंदूंनी बळाचा वापर केला !
हिंदु स्वत: आत्मा विकत नाही, तसा तो दुसर्‍यालाही विकू देत नाही आणि विकत घेतही नाही. खंडनमंडण करून आपले मत दुसर्‍याला पटवून देण्याची हिंदूंची पद्धती आहे. हिंदु धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ऋषीमुनी बाहेर पडले, ते भगवी वस्त्रे परिधान करून आणि कमंडलू घेऊन. सर्व जगभर त्यांनी उदात्त विचारांचा प्रसार केला. चर्चा केली. बैठका घेतल्या. `कृण्वन्तो विश्‍वमार्यम' ही घोषणा त्यांनी केली, तेव्हा त्यांचा स्वत:च्या तत्त्वज्ञानावर ठाम विश्‍वास होता. आपले तत्त्वज्ञान सर्वमांगल्यकारी असल्यामुळे ते लोकांना पटणारच आहे; त्यासाठी तलवारीचा उपयोग करण्याची आवश्यकता नाही. या विषयी ते निश्चिंत होते. तलवारीचा उपयोग हिंदूंनी धर्मप्रसारासाठी केला नाही. आपल्या धर्मावर जेव्हा घाला आला, तेव्हा त्याचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी बळाचा वापर केला आणि शत्रूला पराभूत केले.
मराठ्यांनी टिपू सुलतानावर स्वारी करून त्याचा पराभव केला, तेव्हा मराठ्यांचा सेनापती हरिपंत फडके याला एका कोपर्‍यात टिपूचा मुलगा भेदरलेल्या अवस्थेत लपलेला सापडला. फडक्यांनी त्याची विचारपूस केली. धीर दिला. त्याच्यासाठी सुग्रास भोजन करायला लावले आणि ते त्याला जवळ बसवून भरवले. बळाचा वापर करून त्याला हिंदु करून घ्यावा, असा विचार मराठ्यांच्या मनात आला नाही. टिपू हा बळाने आणि क्रौर्याने हिंदूंना बाटवण्याविषयी कुख्यात होता. त्याचा पराभव मराठ्यांनी तलवारीने केला; पण त्याच्या अजाण मुलावर तलवारीचा उपयोग करावा, असे सेनापती हरिपंत फडक्यांना वाटले नाही.

हिंदूंच्या आत्म्याचे दलाल करण थापर यांसारख्यांचा शासनाने बंदोबस्त करावा !
ओरिसातील वनवासी हे लहान मुलासारखे आहेत. सगळा वनवासी समाज निरागस, निष्पाप फुलासारखा आहे. ख्रिस्ती धर्मप्रसारक बळाने आणि प्रलोभनाने त्यांचा आत्मा विकत घेण्याचे कारस्थान रचतात. ते कारस्थान सरकारने हाणून पाडले पाहिजे; पण सरकार आपले कर्तव्य पार पाडत नाही. उलट आत्मा खरेदी व्यवहार सुलभपणे व्हावा; म्हणून सरकार ख्रिस्ती धर्मप्रसारकांना अनुकूल परिस्थिती निर्माण करत असते. अशा परिस्थितीत त्या निरागस आणि निष्पाप वनवासींचे रक्षण करण्याचे काम विश्‍व हिंदु परिषद करत असते. वनवासींचा आत्मा अपवित्र वस्तूंच्या स्पर्शाने विटाळू नये, ही काळजी विश्‍व हिंदु परिषद घेते. वनवासींना आपल्या कुशीत घेतले नाही, तर गिधाडे त्यांचा चावा घेतील, तो आघात भारताच्या घटनेच्या सार्वभौमत्वावर होईल, हे विश्‍व हिंदु परिषदेला माहीत आहे; म्हणून वनवासींना विश्‍व हिंदु परिषदेने आपल्या पांघरुणात लपेटून घेतले आहे. तरीही या वनवासींना हिंदूंच्या संरक्षणापासून खेचून त्यांचे अपहरण करण्यासाठी गिधाडांची टोळधाड धावून आल्यावर त्यांच्यात आणि हिंदु संघटनात संघर्ष होणे अपरिहार्य आहे. त्या संघर्षात दोन-चार गिधाडांना मार पडणे, अटळ आहे. अशा वेळी ज्यांना गिधाडांविषयी सहानुभूती वाटते, अशा करण थापरसारख्या माणसांनी लक्षात घेतले पाहिजे की, मूळ मुद्दा वनवासींचे रक्षण करणे, हा आहे. त्यांना गिधाडांपासून संरक्षण हवे आहे. ते सरकार देणार नसेल, तर जनतेने दिले पाहिजे. विश्‍व हिंदु परिषद जे जनता जनार्दनाला हवे, ते काम करत आहे. भारतीय संविधान निरागस आत्म्यांचे, निरपराध जिवांचे रक्षण करण्यासाठी बनवले आहे. विश्‍व हिंदु परिषद घटनेला जे अपेक्षित ते काम करत आहे. करण थापर, गिधाडांपासून निरपराध जिवांचे रक्षण करणे म्हणजे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा अपराध आहे, असा विचार फैलावत आहे. सरकारने गिधाडांपासून वनवासींचे रक्षण केले पाहिजे, असे मत थापर मांडत नाहीत. वनवासींना गिधाडांच्या स्वाधीन करावे आणि विश्‍व हिंदु परिषदेला वनवासाला पाठवावे; म्हणून त्यांनी लेखणी उचलली आहे. हिंदूंच्या आत्म्याचे करण थापरसारखे लोक दलाल आहेत. त्यांचा बंदोबस्त शासनाने केला पाहिजे. थापर यांच्या बाकीच्या मुद्यांचे धोकादायक स्वरूप पुढच्या आठवड्यात पाहू.

| मित्रांना पाठवा | 29 - वाचक संख्या | छापील प्रत


निगडीत वृत्त : लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार

करण थापरना एकांतवास दिला पाहिजे ! : 2008-09-07
आत आणि बाहेर ! : 2008-08-31
तेरा देश मेरा देश ! : 2008-08-24
दोन मुले तरच पोलिसांत नोकरी : 2008-08-17
जिहादला हिंदूंचे उत्तर काय ? : 2008-08-10
स्वत:च्याच थोबाडीत मारणार्‍या दाभोळकरांसाठी... : 2008-08-03
राहुल पणजोबांपेक्षा वेगळा नाही ! : 2008-07-27
विश्‍वास न ठेवण्याजोगे सरकार ! : 2008-07-20
अखंड हिंदुस्थान निर्माण करायचा आहे ! : 2008-07-16
समाज सनातन संस्थेबरोबर आहे ! : 2008-07-13
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links