भाजपमध्ये आता भारताची फाळणी करणा - nया जिनांवर कौतुकाची फुले उधळण्याची स्पर्धाच लागली आहे . जिनांवर स्तुतिसुमने उधळणारे हे लोक उद्या शिवाजी महाराजांपेक्षा बाबर , औरंगजेब थोर होते असे सांगायला कमी करणार नाहीत . अशा कठोर शब्दात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जसवंत सिंग , अडवानींसारख्या भाजप नेत्यांना धारेवर धरले आहे . आपल्या ‘ सामना ’ या मुखपत्रात अग्रलेखातून त्यांनी हे वार केले आहेत .
इस्लामी दहशतवादाचे होलसेल गोदाम म्हणून पाकिस्तानकडे पाहिले जाते . त्या गोदामाचा निर्माता बॅ . जिना . त्याच्यावर कसली फुले उधळता ? स्वत : स प्रखर राष्ट्रभक्त व हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे ' भाजप ' नेते जिन्यांवरून वारंवार का घसरतात हेच समजत नाही . असे आणखी किती वेळा घसरणार ? असा उद्वेगजनक प्रश्न ते यावेळी विचारतात .
बाळासाहेब पुढे म्हणतात , काही वर्षांपूर्वी लालकृष्ण आडवाणी हे पाकिस्तानात जाऊन बॅ . जिनांविषयी चार शब्द प्रेमाचे बोलले होते . जिना यांच्या कबरीवर फुले उधळत जिना इतिहासपुरुष , विश्वपुरुष असल्याचे मत त्यांनी मांडले होते . भारताची फाळणी करताना लाखो निरपराध्यांचे रक्ताचे पाट वाहणारा जिना इतिहासपुरुष कसा काय होऊ शकतो ?
जसवंत सिंग यांचे पुस्तक ' जिना : इंडिया , पार्टिशन , इंडिपेण्डन्स ' हे पुस्तक प्रसिध्द होत असून त्या पुस्तकात जसवंत सिंगांनी फाळणीचा गुन्हेगार जिना नसून पंडित जवाहरलाल नेहरू हेच फाळणीला जबाबदार असल्याचे ज्वलंत विचार मांडले आहेत . ही असली विधाने म्हणजे प्रसिध्दी मिळविण्याचा टाइमपास आहे , असे बाळासाहेब म्हणतात .
आपल्या या अग्रलेखात बाळासाहेब जसवंत सिंगांची कुंडली मांडण्यास पाठीपुढे पाहत नाहीत . राजस्थानातील राजघराण्याशी त्यांचे नाते आहे , पण लोकसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र मानवेंद्र सिंग यांचा पराभव राजस्थानात झाला . स्वत : जसवंत सिंग हे यावेळी दार्जिलिंगमधून लोकसभेवर निवडून गेले . त्यांचे इंग्रजी भलतेच फर्डे आहे . या फर्डेपणाचा अर्थ अनेकदा सामान्यांच्या डोक्यावरून जातो , अशी टीका होते . अर्थात त्यावर आम्हाला टीकाटिपणी करण्याची गरज नाही . भारतची फाळणी करणाऱ्या व मुसलमानात धर्मांधता भिनवणाऱ्या बॅ . जिनांच्या प्रेमात भाजप नेत्यांनी का पडावे हीच आमच्या मनातली सल आहे .
भारतातील मुस्लिमांना परक्याप्रमाणे वागवले जात असल्याचा साक्षात्कार जसवंत सिंगांना झाला . ' स्वातंत्र्योत्तर काळाचा इतिहास लिहिताना जिना यांना खलनायक ठरविण्यात आले . भारतात जिना यांचे भूत उभे करण्यात आले आहे . नेहरूंची भूमिकाही फाळणीस पोषक ठरली . महात्मा गांधी , राजाजी , मौलाना आझाद यांच्याकडे फाळणीचा निर्णय सोपवला असता तर फाळणी झालीच नसती . मुस्लिमांनी फाळणीची जबर किंमत मोजली ,' असा विचारही जसवंत सिंगांनी मांडला असल्याने भारतीय जनता पक्षालाही या वक्तव्याची जबर किंमत मोजावी लागेल , अशी तंबीही बाळासाहेब देतात .
फाळणीमुळे लाखो हिंदू - मुसलमान देशोधडीस लागले , निर्वासित झाले . माथेफिरू महंमदाप्रमाणे जिना वागला . जिना यांनी स्वत : च्या हट्टासाठी पाकिस्तानची निर्मिती केली . त्या हट्टापुढे काँग्रेसचे तेव्हाचे पुढारी झुकले . ते झुकले , कारण तेव्हा ते सगळेच थकले होते . पं . नेहरू , गांधींनी लाख चुका केल्या असतील , पण म्हणून बॅ . जिनाला थोर ठरविणारा इतिहास कोणी खरडू नये . हिंदू जनता अशा इतिहासाची होळी केल्याशिवाय राहणार नाही , असे बाळासाहेब बजावतात .
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments