काहि आठवड्यापुर्वी मी एक कविता एकली, कवितेशी दुरचाही सबंध नसलेल्या माझ्या एका जवळच्या मीत्राकडुन. त्यानंतर मी झेन कोआन वर अजुन थोड कलेक्षन गोळा केल आहे.
कोआन हा प्रत्यकक्षात झेन शिष्य व गुरु ह्यातला संवाद असतो जो झेनचि मुलभुत तत्व सांगत असतो. आणी हा संवाद कधि कधि ईतकी लहान असतो कि ति कवितेत हि एकवली जाऊ शकतो. कोआन वाचण्यापलीकडे मला झेनबद्दल काहीहि ज्ञाण नाही आहे. पण मला ह्या कोआनचे संवाद फारच आवडतात आणि म्हणुनच मि हे कोआन्स मराठीत भाषांतरित करुन कट्यावर मला वेळ मिळेल तसा शेअर करणार आहे.

तर पहिला कोआन जो मी माझ्या मीत्राकडुन एकला तो.

बुध्द होण्यापुर्वी
डोंगर, डोंगर असतो
नद्या, नद्या असतात
आकाश, आकाश असतो

बुध्द होताना
डोंगर, डोंगर नसतो
नद्या, नद्या नसतात
आकाश, आकाश नसतो

बुध्द झाल्यावर
डोंगर, डोंगर असतो
नद्या, नद्या असतात
आकाश, आकाश असतो
पण तुम्ही बुध्द झालेले असता.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links