महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हिंदी किंवा इंग्रजी वाहिन्यांवर मोठ्या दिमाखात मराठीतून मुलाखती देत आहेत. चॅनलला गरज असेल तर ते माझ्या मुलाखतीचे हिंदी किंवा इंग्रजी सबटायटल्स दाखवतील, मी मराठीतूनच बोलणार असा अस्सल मराठी बाणा दाखवणाऱ्या राज ठाकरे यांचा मराठी मनाला अभिमान वाटतोय. परंतु, या पक्षाचे ठाण्यातले उमेदवार राजन राजे यांनी मात्र प्रचारासाठी चक्क हिंदीत पत्रके वाटण्यास सुरुवात केली. या पत्रकांनी पक्षाच्या धोरणाची पायमल्ली केलेली नाही का असा सवाल त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
'राज ठाकरेसाहेब के मनसे पक्ष का वीर लडाकू योद्धा' असा राजन राजे यांचा परिचय त्यात देण्यात आला असून, परिचय पत्रातले सर्व मुद्दे योग्य आणि राजन राजे यांचे कर्तृत्व दर्शवणारे असले तरी ते हिंदी भाषेत असल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. नेता ठामपणे मराठीतून भूमिका मांडत असताना त्यांचे उमेदवार मात्र हिंदीतून पत्रके छापून परप्रांतियांच्या मतांचा जोगवा मागत आहेत. त्यामुळे मनसेचे मराठी प्रेम हे किती बेगडी आहे हेच सिद्ध होत असून निवडणुकीत ठाणेकर जनता मनसेला जागा दाखवून देईल
1 Comment Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
IS raj thakeray aware of all such things ?