इतिहासाच्या पुस्तकातून दादोजी कोंडदेव यांचे नाव वगळायचे, तर ज्यांनी ही मागणी केली; त्यांचे नाव घालायचे का, असा प्रश्‍न करत ``हिंमत असेल, तर पुरावे समोर घेऊन चर्चा करा; पण असे मागच्यामागे इतिहास पुसून टाकण्याचा प्रकार योग्य नाही'', अशी टीका शिवसेना कार्याध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे यांनी आघाडी काँग्रेस शासनावर केली. ते येथील `दुर्गवैभव महाराष्ट्राचे' या छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.

इतिहासातील क्षण जिवंत करणार्‍यांना कोणत्याही समितीची गरज नाही !
ते पुढे म्हणाले की, राज्यात सध्या इतिहासाचे धिंडवडे काढण्याचे काम सुरू आहे. इतिहास निर्माण करता येत नसेल, तर बिघडवू तरी नका. इतिहास वाचण्यासाठी उपलब्ध होता; मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी तो आपल्याला पहायला शिकवला. इतिहासातील क्षण त्यांनी जिवंत केले, त्यांना कोणत्याही समितीच्या अध्यक्षपदाची गरज नाही.
1 Comment   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links