कुठे दिंडीचा सराव... कुठे पाहुण्यांची सरबराई... कुठे पुस्तक प्रदर्शनाची तयारी... कुठे मऱ्हाटी पोषाखांची जमवाजमव... अरबांच्या दुबईतले बुधवारचे चित्र असे होते. त्यास निमित्त दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे. दोन दिवसांपूवीर् अचानक पडलेला तुफान पाऊस आणि वादळ यांनी निर्माण केलेले अडथळे दूर सारून वाळवंटी मांडलेल्या या डावाचा उद्घाटनाचा झेंडा फडकावण्यासाठी दुबईत दाखल झालेली मराठी मंडळी सज्ज झाली आहेत.

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज, गुरुवारी दुबईत होईल. त्यासाठी चाळीसहून अधिक साहित्यिक, विविध क्षेत्रातील नामवंत, कलाकार तसेच सुमारे चारशे साहित्यप्रेमी बुधवारपर्यंत दुबईत दाखल झाले होते. 'दुबईतील मराठी मंडळींनी कमालीच्या आस्थेने संमेलनाची तयारी केली आहे.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links