हे नविन वर्ष,
आम्च्या राज्यकर्त्यांना व त्यांच्या करवित्यांना,
सगळ्या न्युज चॅन्न्ल्स व त्यांच्या धडाडिच्या पत्रकारांना,
पोलिसातिल पांडुना आणि आंडुना,
महानगर पालिकेतील शिपायापासुन साहेबांना,
कायद्याच्या लांब हाताच्या कावळ्यांना,
मंत्रालयच्या सहाव्या मजल्याला,
दर मजलि ५० रुपये जास्त घेना-या बिल्डरांना,
सेकन्ड कार, सेकन्ड होम आणि सेकन्ड शादी वाल्याना,
सगळ्या परमपुज्य माता, देव्या व बाबांना,
आमच्या सेलीब्रेटिजना,
सिफेस वर फिरायला येणा-या कुत्र्यांना व त्यांच्या मालकांना,
मल्टिप्लेक्स चालकांना व मालकांना,
सगळ्या नगरसेवक व इतर समाजसेवकांना

सुखाचे व समृध्दीचे जावो
आणि त्यानंतर थोडि समृध्दी शिल्लक राहिली
तर इतरांनाही हे वर्ष सुखाचे जावो.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links