राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पद्मसिंह पाटील यांना अटक केल्याचे प्रकरण
काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने अटक केली आहे. या प्रकरणी राज्यातील काँग्रेस आघाडी शासनाच्या तपासाच्या भूमिकेबद्दल ज्येष्ठ समाजसेवक़ अण्णा हजारे व विविध पक्षांतील नेते यांनी दिलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.
ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे म्हणाले, ``पद्मसिंह पाटील यांच्यावर राज्य सरकारने यापूर्वीच का कारवाई केली नाही ? हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे या देशाला पाकिस्तानमधील अतिरेक्यांपेक्षा देशातील राजकारण्यांचाच जास्त धोका आहे. या प्रकरणातील आरोपींना राज्य सरकारने पाठीशी घातले असून यामध्ये राज्य सरकारचा हात आहे.''
पद्मसिंह पाटील अटक प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने हात झटकले !
पद्मसिंह पाटील यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार म्हणाले, ``या हत्येचा पक्षाशी काही संबंध नाही. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग हा स्वतंत्र विभाग आहे. त्यांच्या कामात हस्तक्षेप करणे योग्य नाही. दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील म्हणाले, ``केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत तपास सुरूच आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीला लक्ष्य करणे योग्य नाही. तसेच अंतिम चौकशी पूर्ण होईपर्यंत या प्रकरणावर भाष्य करणे अयोग्य आहे.''
मुख्यमंत्र्यांचा बोलण्यास नकार
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने यात हस्तक्षेप करत नाही'' असे सांगून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिक माहिती देण्यास नकार दर्शविला
अण्णा हजारे यांच्यामुळे हे प्रकरण उघडकीस !
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. गोपीनाथ मुंडे यांनी यापूर्वीच पद्मसिंह पाटील यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती, असे मत व्यक्त केले आहे, तर भाजपचे आमदार श्री. विनोद तावडे यांनी श्री. अण्णा हजारे यांनी पद्मसिंह पाटील यांच्याविरुद्ध आवाज उठवला नसता, तर हे प्रकरण उघडकीस आले नसते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत म्हणाले, ``केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने पद्मसिंह पाटील यांना अटक केली; मात्र या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी राज्य सरकारचे पोलीस काय करत होते ? याचा उलगडा झाला पाहिजे. राज्य सरकारच्या पोलिसांनी स्वत:ची अब्रू घालवली आहे.''
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments