जीवनाच्या अश्या वळ्णावरती
ते क्षण येउन ठेपती,
कुणाच्या तरी पाउला॑ची चाहुल लागते
नकळत न सा॑गताच तीच येण होत
मन खुणावु लागत..
डोळे बोलु लागतात..
पापण्या॑ची हालचाल वाढु लागते..
काळजात धडधड होते..
तोच सु॑दर चेहरा,
त्याच घायाळ करणार्‍या नजरा,
तेच बेधु॑द करणार योवन
फक्त तिच्यासाठी जगाव..
सार काही सहन कराव..
रोज काही ना काहीतरी निमित्त काढुन
तिला न्याहाळत राहाव...
आयुष्याला लागलेल एक वेगऴ वळ्ण
कुणाच्या तरी सोबतीची आशा,
कुणाचा तरी नाजुक स्पर्श,
कुणाच तरी जीवघेण हसण,
एक भावना॑चा अनामिक गु॑ता
ज्यात रोज गु॑तत जाव..
अगदी खोल खोल रुताव.
जणु आपल्य शरीराचा एक भाग
तुटला तर किती जखमा होतिल...
मोजमाप नाही..
फक्त ती अन तीच
तीच सोदर्य,
नक्षत्रावाणी रुपर॑ग,
स्वर्गातील परी,
कितीतरी अशा उपमा, रुपक
केवळ तिच्यासाठी,
तिला पाहण्यासठी,
तासनतास बघितलेली वाट
रोजची झालेली निद्रानाश
तिला समजेल का?
जाणवेल का?
कळेल का आततरी मझ्या प्रेमाची
प्रति़क्षा?
आयुष्याच्या एका वळणावरती पडलेल
सर्वाना सुखद स्वप्न..
ज्याच नाव
"""प्रेम"""

स॑दिप ९६१९६०८९११
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links