आज मुलगी माझी म्हणते मला,
बाबा आज कामाला जाउ नका.
समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला,
काही करून ती ऐकेना .
आज मुलगी माझी म्हणते मला,
बाबा आज कामाला जाउ नका.
काय समजावू ऑफिसचे महत्व तिला,
त्याशिवाय काही घर चालेना .
आज मुलगी माझी म्हणते मला,
बाबा आज कामाला जाउ नका.
तिचा आहे अठ्ठहास,
बाबा तुम्ही आज थांबा घरात.
आज मुलगी माझी म्हणते मला,
बाबा आज कामाला जाउ नका.
रोज घरी मी एकटी असते,
बाहुल्या असूनही बाबांची कमी मला भासते.
आज मु लगी माझी म्हणते मला,
बाबा आज कामाला जाउ नका.
गोष्टींचे पुस्तेके आहेत सगळी,
पण ती ऐकवायला घरात नाही कोणी.
आज मुलगी माझी म्हणते मला,
बाबा आज कामाला जाउ नका.
तुम्ही म्हणता “मला खेळण्या आणण्यासाठी तुम्ही ऑफिसला जाता“,
मला त्यांची गरज नाही, घरात आहेत त्या भरपूर आता.
आज मुलगी माझी म्हणते मला,
बाबा आज कामाला जाउ नका.
तुम्ही सकाळी लवकर जाता,
रात्री मी झोपल्यावर घरी येता,
सांगाबरे माझ्या वाटेला तुम्ही कधी येता?
आज मुलगी माझी म्हणते मला,
बाबा आज कामाला जाउ नका.
काय सांगू ह्या चिमुकलीला,
ऑफिस ला जाणारया बाबांची अनोखी गाथा.
आज मुलगी माझी म्हणते मला,
बाबा आज कामाला जाउ नका.
Tell a friend
Bury
Comments