Warning: mysql_fetch_array(): supplied argument is not a valid MySQL result resource in /home/marat6/public_html/libs/html1.php on line 63 www.marathikatta.com - 'बीडीडी'दुरुस्तीसाठी मनसे पुढे!
तुटके जिने... मोडक्या खिडक्या... बिकट अवस्थेतली शौचालये... फुटलेले प्लास्टर... अशी अवकळा आलेल्या बीडीडी चाळींत जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या साडेसोळा हजार कुटुंबांचा प्रश्न आणि चाळींच्या पुनविर्कासाचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचलून धरला आहे. पंधरा दिवसांत दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
मुंबईत शिवडी, नायगाव, वरळी, डिलाईल रोड येथे ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या बीडीडी चाळींच्या पुनविर्कासाचे घोंगडे अजूनही भिजतच आहे. मुंबईत २६० बीडीडी चाळी आहेत. त्यामध्ये बहुतांश मराठी कुटुंबे राहतात. या चाळींचा पुनविर्कास करण्याचे सरकारने दिलेले आश्वासन हवेतच विरून गेले.
मनसेच्या विद्याथीर् सेनचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर, विभाग अध्यक्ष बंटी म्हशीलकर, प्रवीण काकड यांनी बीडीडी चाळींचे महाव्यवस्थापक शिवदासन यांची बुधवारी यासंदर्भात भेट घेतली. चाळींमधील १६ हजार ४२० खोल्यांमध्ये राहात असलेल्या रहिवाशांच्या जिवाला धोका असल्याचे यावेळी निदर्शनास आणण्यात आले. शिवदासन यांनी चाळींच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments