मराठी माणसानं आधी राष्ट्राचा विचार केला आणि मग राज्याचा... पण ही चूक झाल्याचं आता वाटू लागलंय. उत्तर प्रदेशी आणि बिहारींनी इथे येऊन आपले हक्क हिरावून घेतलेत. रेल्वेत नव्याने भरती झालेल्या साडेचार-पाच हजार उत्तर प्रदेशी आणि बिहारी टीसींना बाहेर हाकलून लावा... ही साफसफाई झाल्यानंतर नवनिर्माण होईल, असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला.
मनसेतर्फे विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी प्रकाश महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज औरंगाबादला गेले होते. त्यावेळी महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोरच त्यांची जोरदार सभा झाली. त्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज यांनी आपला मराठीपणाचा मुद्दा पुन्हा लावून धरला आणि उत्तर प्रदेशी आणि बिहारींवर हल्लाबोल केला.
संपूर्ण राज्यात परप्रांतीय घुसले आहेत, त्यांना आता रोखले पाहिजे, त्याशिवाय आपल्याला आपले हक्क मिळणार नाहीत, असे राज यांनी खडसावले. याच भय्यांमुळे मराठी तरुणांवर बेकारीची वेळ आली आहे. मुंबई भूमिपुत्रांची आहे, त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मुंबईत येताना तरुणांनी आपल्या मित्रांनाही सोबत आणले पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments