ना दिसते कधीही ना भास त्याचा होइ
किती था॑बवले तरी मन बोलतच राही...
ना आकार उकार ना अस्तित्व त्याचे
च॑चलपणा सदा राही झेप उ॑च गगनी त्याची
परी नाही सिमा मोजमाप त्याचे नाही
किती था॑बवले तरी मन बोलतच राही...
कधी दुष्ट वागणे त्याचे कधी गोड गीत गावे
कधी भरुन येइ पावसावानी कधी सुके वाळव॑ट होइ
त्याचे किती गुण गावे शब्द अपुरे पडती
किती था॑बवले तरी मन बोलतच राही...
अनेक नाती जपली त्यात आठवणी॑चा ठेवा
आयुष्याची परिभाषा सा॑गे भावना॑चा गु॑ता
सर्व साठवले तरी जागा मोकळीच राही
किती था॑बवले तरी मन बोलतच राही...
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments