महाराष्ट्रात `हज हाऊस'प्रमाणे हिंदु भाविकांसाठी `अमरनाथ हाऊस' किंवा `वैष्णोदेवी हाऊस' निर्माण करावे, ही समस्त हिंदुजनांची मागणी आम्ही पुढे रेटीत आहोत, असे शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी दैनिक `सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.
श्री. ठाकरे यांनी अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे सरकार खरोखरीच निधर्मी आहे ना ? मग मुसलमानांवर सवलतींचा वर्षाव करतांना त्यांतील काही कण हिंदूंवर पडले, तर त्याचा निधर्मीपणा बावनकशी सोन्याप्रमाणे उजळून निघेल. महाराष्ट्रात हज यात्रेकरूंच्या सोयीसुविधांकडे लक्ष देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. सरकारी मदत तिथे जाते. मग हे फक्त मुसलमानांसाठीच का ? महाराष्ट्रातील लाखो भाविक प्रतिवर्षी स्वत:चा जीव धोक्यात घालून वैष्णोदेवी व अमरनाथ यात्रांस जात असतात. सरकारने मुसलमान भाविकांसाठी इतकी मंडळे व महामंडळे स्थापन केलीच आहेत, आता एखादे महामंडळ वैष्णोदेवी व अमरनाथ यात्रेकरूंच्या सोयीसुविधांकडे लक्ष देण्यासाठी स्थापना करा.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments