मालाड मतदारसंघातील मनसेच्या उमेदवार निला देसाई यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या विभाग क्रमांक ४२च्या नगरसेविका सुप्रिया पवार सध्या मनसेचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार दीपक उर्फ अप्पा पवार यांचा जोरदार प्रचार करीत आहेत. सुप्रिया पवार यांनी पक्षावर निष्ठा न ठेवता आपल्या दिरासाठी राज ठाकरे यांचा आदेशच झुगारल्याचे चित्र या मतदारसंघात दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात पक्षाचे पदाधिकारी लपून छपून प्रचार करीत असतात मात्र सुप्रिया पवार चक्क आपल्या दिराचा उघडपणे प्रचार करीत आहेत. दिपक पवार यांनी मनसेची उमेदवारी मागितली होती. मात्र राज ठाकरे यांनी निला देसाई यांना संधी दिली. त्यामुळे सुप्रिया पवार यांची पंचाईत झाली. आता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार करायचा की, ज्यांच्यामुळे आपण नगरसेविका झालो त्या दिराचा असा प्रश्न त्यांना पडला. अखेर त्यांनी पक्षाच्या ‘इंजिना’ ऐवजी दिराचे चिन्ह ‘सिलिंडर’ डोक्यावर घेतले आहे. सिलिंडरचे चिन्ह असलेला पेहराव घालून त्या मतदारसंघात घरोघरी फिरत आहेत. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत तर काही जणांनी सुप्रिया पवार यांची साथ देणे सुरु केले आहे. विशेष म्हणजे वॉर्ड क्रमांक ४२ मध्ये दीपक पवार यांनी मनसेला चांगलेच खिंडार पाडले आहे. मालाड मतदारसंघात मुंबईतील सर्वात जास्त अपक्ष िरगणात आहेत. या मतदारसंघात काँग्रेसचे अस्लम शेख, भाजपचे आर. व्ही. सिंग मैदानात आहेत. त्यांच्याही विरोधात बंडखोरी झालेली आहे. इतर मतदारसंघात मनसेमुळे मराठी मतांत फूट पडेल
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments