मुंबईत ३५ जागा उत्तरभारतीयांना द्याः निरुपम

मुंबई-ठाण्यातील ६० पैकी ४० विधानसभा मतदारसंघांत उत्तर प्रदेशी आणि बिहारींची संख्या वाढली असून त्यातील किमान ३५ जागी उत्तरभारतीयांना निवडणुकीचे तिकीट मिळायलाच हवे , अशी मागणी काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी केली आहे.
उत्तर भारतीय समाज परिषदेच्या कार्यक्रमासाठी नागपुरात आलेल्या निरुपम यांनी महाराष्ट्राला परप्रांतीयांनी कसा वेढा दिला आहे याची आकडेवारीच पत्रकारांना पुन: पुन्हा ऐकवली. ते म्हणाले , ' मुंबईबरोबरच पुण्यातही परप्रांतीयांचे वर्चस्व वाढते आहे. पुण्यात नव्याने निर्माण झालेल्या १२ विधानसभा मतदारसंघांपैकी निम्म्याहून अधिक जागी परप्रांतीय मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. निम्म्या नागपूरवर तर उत्तर प्रदेशी आणि बिहारींचा प्रभाव असल्याचे निरुपम यांनी सांगितले.
उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी सज्ज व्हा आणि आपली भक्कम एकजूट त्यांना दाखवून द्या असे विषही निरुपम यांनी ओकले आहे. त्यानंतर पत्रकारांनी विचारणा केली असता मात्र त्यांनी सारवासारव केली.
7 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links