शत्रूराष्ट्र असलेल्या पाकसमोर गुडघे टेकणारे राज्यकर्ते नकोत, तर पाकचे अस्तित्वच नष्ट करणारे राष्ट्रप्रेमी राज्यकर्ते हवेत !
भारतापेक्षा पाक डावपेचात हुशार !
लाहोर, ३ ऑगस्ट (प्रे.ट्र.) - मुंबईवरील अतिरेकी आक्रमणातील सूत्रधारावर कारवाई करत असल्याचा देखावा उभा करण्यासाठी पाकमधील सर्वोच्च न्यायालयात चालू असलेला खटला आज त्या न्यायालयाने अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केला.
पंजाब प्रांतातील नव्या महाधिवक्त्याची नेमणूक करण्याचा तांत्रिक विषय हा खटला स्थगित होण्यामागील कारण आहे, असे सांगण्यात येत असले, तरी हा खटला पाक हेतूपुरस्सर लांबवत असल्याचे स्पष्ट आहे. (अशा पाकशी शांतता चर्चा करण्यात वेळ दवडणार्या काँग्रेस शासनाला आतातरी अक्कल येणार आहे का ? - संपादक)भारताने या प्रकरणी अनेक पुरावे सादर करूनही आरोपींच्या विरुद्ध पुरेसे पुरावे नसल्याचे पाकचे म्हणणे आहे. संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेल्या `जमात उद दावा' या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफीझ सईदचा मुंबईवरील आक्रमणातील सहभाग दाखवणार्या पुराव्यांचा पाचवा संच कालच भारताने पाककडे सोपवला होता. तरीही हे पुरावे पुरेसे नसल्याचा कांगावा पाक करत आहे. पाकने यापूर्वीच हाफीझ सईदची सुटका केली आहे.
हाफीझला शिक्षा देण्यासाठी पाककडे पुरेसे पुरावे ! - केंद्रीय परराष्ट्रमंत्री
नवी दिल्ली - मुंबईवरील अतिरेकी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफीझला शिक्षा देण्यासाठी पाककडे पुरेसे पुरावे आहेत. तथापी पाक प्रतिदिन विविध क्लृप्त्या लढवून हा खटला लांबवत आहे. पाक अशी प्रक्रिया लांबवून भारताच्या सहनशीलतेची परीक्षा पहात आहे, असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री एस्.एम्. कृष्णा यांनी आज केले. (पाकसमोर शरणागती पत्करणारी भारताची हतबल प्रतिक्रिया ! गेल्या ६२ वर्षांमध्ये पाकला कठोर आव्हान देऊन त्याच्यावर दबाव निर्माण करण्याचे तंत्र सर्वपक्षीय भारतीय राज्यकर्ते विकसित करू न शकणे, हे काँग्रेसने आत्मसात केलेल्या गांधींच्या षंढवादी विचारांचे फलित होय ! शत्रूराष्ट्र असलेल्या पाकसमोर गुडघे टेकणारे राज्यकर्ते नकोत, तर पाकचे अस्तित्वच नष्ट करणारे राष्ट्रप्रेमी राज्यकर्ते हवेत ! - संपादक)भारताने पाकला आतापर्यंत ५ मार्च, १३ मार्च, २० मे, ९ जून आणि १ ऑगस्ट या दिवशी हाफीज याच्या विरोधातील पुरावे पाककडे सुपुर्द केले आहेत. (काँग्रेसी राज्यकर्त्यांनी अफझलला वेळीच फाशी दिली असती, तर आज पाकला याबाबत प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार त्यांना लाभला असता ! - संपादक).
मुंबईवरील अतिरेकी आक्रमणामागे लष्कर-ए-तोयबाचा हात ! - इंग्लंड संसदीय समितीचा अहवाल
लंडन, ३ ऑगस्ट (प्रे.ट्र.) - मागील वर्षी झालेल्या मुंबईवरील अतिरेकी आक्रमणासह लंडन, माद्रीद, बाली आदी जगभरातील विविध ठिकाणी झालेल्या अतिरेकी आक्रमणांमागे `लष्कर-ए-तोयबा' या आतंकवादी संघटनेचा हात होता, असे लंडनच्या संसदीय समितीच्या अहवालात म्हटले आहे. (`लष्कर-ए-तोयबा'ला पोसणार्या पाकिस्तानला याविषयी जाब विचारून आतंकवाद नष्ट करण्यासाठी लंडन पाकिस्तानवर दबाव आणणार का ? - संपादक)या अहवालात `सीआयए' या अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेच्या माजी अध्यक्षांची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तीत त्यांनी म्हटले आहे, ``पाकिस्तानातील आतंकवादी संघटना `लष्कर-ए-तोयबा' हीच मुंबईवरील अतिरेकी आक्रमणाला कारणीभूत आहे.'' (अमेरिकेचा दुटप्पीपणा ! एकीकडे पाकपुरस्कृत आतंकवादी संघटनेने मुंबईवर आक्रमण केल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे पाकिस्तानला आर्थिक निधी पुरवून आतंकवाद पोसण्यात हातभार लावायचा, असेच धोरण आतापर्यंत अमेरिकेचे राहिले आहे. त्यामुळे या आतंकवादी कारवायांना अमेरिकाही तितकीच उत्तरदायी आहे. - संपादक)
निगडीत वृत्त : आरक्षणाचा भस्मासूर
आरक्षणासाठी मराठा समाज आणि मुसलमान एकत्र येणार ! : 2009-07-24
अल्पसंख्यांकांसाठी माहिती व तंत्रज्ञान शाखेच्या तुकड्या वाढवल्या ! : 2009-06-20
आरक्षणाच्या मुद्यासाठी ८ जून रोजी शिवा संघटनेतर्फे विधान भवनावर धडक मोर्चा : 2009-05-27
`अनुसूचित जमातीच्या मागण्या मान्य न झाल्यास क्रांती करू', असा इशारा देऊन समाजात फूट पाडणारे भाजपचे जात्यंध नेते ! : 2008-12-16
1 Comment Tell a friendBury
written by mandarb 1017 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
पाकिस्तानकडून दुसरी काय अपेक्षा करणार. कोग्रेसच्या नालायक धोरणामुळॅ लो़काना आपले प्राण गमवावे लागत आहे. तरी आपाण त्यानाच निवडून देत आहोत. नवीन पक्ष काढुन आपापसात फुट पाडत आहोत.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
पाकिस्तानकडून दुसरी काय अपेक्षा करणार. कोग्रेसच्या नालायक धोरणामुळॅ लो़काना आपले प्राण गमवावे लागत आहे. तरी आपाण त्यानाच निवडून देत आहोत. नवीन पक्ष काढुन आपापसात फुट पाडत आहोत.