आझमींना मराठी भाषेचा गंधही नाही. महाराष्ट्राची संस्कृती, ऐतिहासिक व्यक्तींचीही त्यांना माहिती नाही, असे सपाच्याच एका माजी प्रदेशाध्यक्षाने सांगितले. सपाने महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त मुस्लिम महिलांचा मेळावा घेतला. मेळावा होऊन तीन महिने उलटल्यावर पक्षकार्यालयातील पोस्टरवरील महात्मा फुले यांच्या छायाचित्राकडे अंगुलीनिदेर्श करीत आझमी यांनी 'यह चाचा कौन है?' असा सवाल केला होता, याचेही स्मरण या माजी प्रदेशाध्यक्षाला या निमित्ताने झाले!
मराठी भाषेतील शपथेवरून विधानसभेत झालेल्या रणकंदनाच्या पार्श्वभूमीवर, समाजवादी पाटीर्चे महाराष्ट्राचे नेते अबू आझमी अखेर आज, बुधवारपासून मराठीची शिकवणी पुन्हा सुरू करणार आहेत. पक्षातील अनेक सहकाऱ्यांनी अबूभाईंच्या मुखातून अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी मायबोली बाहेर पडावी, याकरिता प्रयत्न केले होते; परंतु त्यांनी हात टेकले. मात्र आता मनसेच्या दणक्यानंतर आझमींनी पुन्हा एकदा पुस्तकांवरील धूळ झटकण्याचे ठरवले आहे.

तुम्ही मराठी का शिकत नाही? अशी विचारणा केली असता 'बुधवारपासून मी मराठी शिकणार आहे' असे आझमींनी सांगितले. कुर्ला येथील शाळेतील शिक्षक शेख युसुफ यांनी माझ्या मुलांना मराठी शिकवले होते. आता त्यांच्याचकडे मीही अभ्यास सुरू करणार आहे. यापूवीर्ही मराठी शिकण्याचा प्रयत्न केला; परंतु जमले नाही. एखादी भाषा नीट न बोलणे हा त्या भाषेचा मी अवमान समजतो, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

आझमींनी मराठी शिकावे, यासाठी त्यांना शिक्षक देण्याची तयारी मी दाखवली होती; परंतु, 'मला सवड नाही', असे सांगत त्यांनी ते टाळले. महाराष्ट्रात राजकारण करायचे तर मराठी यायला हवे, हे मी त्यांना परोपरीने सांगितले. पण त्यांनी ऐकले नाही, अशी आठवण सपाचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष व शिक्षक सभेचे नेते रमेश जोशी यांनी सांगितली. जोशींप्रमाणेच सपाच्या प्रदेशाध्यक्षपदी राहिलेले हुसेन दलवाई यांनीही पक्ष सोडला. त्यांनीही आझमींच्या मराठी न शिकण्याच्या प्रवृत्तीबाबत आश्चर्य व्यक्त केले. सपाचे माजी आमदार नवाब मलिक म्हणाले की, गेली ५० वषेर् महाराष्ट्रात राहत आहे. विधानसभेत गेलो तेव्हा अन्य सदस्यांना म्हणणे समजावे, यासाठी प्रयत्नपूर्वक मराठी शिकलो. मराठी वृत्तपत्रे, पुस्तकांचा जाणीवपूर्वक अभ्यास केला. आझमींना धर्म, भाषेच्या आधारे संकुचित राजकारण करायचे असल्याने ते मराठी शिकले नसावेत. समाजवादी युवाजन सभेचे मुंबईचे माजी अध्यक्ष सुनील गणाचार्य यांनी, 'सपाला काही मराठी चेहरे हवे होते, त्यासाठी त्यांनी आम्हाला जवळ केले होते. प्रत्यक्षात त्यांना मराठी माणसे व मराठी भाषा यांच्यावर प्रेम नाही', अशी टीका केली.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links