राज ठाकरे यांना अटक होताच मनसेचे कार्यकर्ते लगेच सक्रिय झाले. पदाधिका-यांना अटक होत असल्याचे पाहून रत्नागिरीतले अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले. तर काहींनी राज्यभर फोनाफोनी करायला सुरुवात केली. त्यामुळे मुंबई आणि कोकणात तणाव निर्माण झाला.
मुंबई-गोवा हाय वे वर अडथळे निर्माण करण्याचा प्रकार घडला. कळंबोली परिसरात तसेच निवळे फाटा येथे दगडफेक झाली. त्याचवेळी मुंबईत अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. राज विरोधात बोलणा-या काँग्रेस प्रवक्ता संजय निरुपम यांच्या अंधेरी येथील ऑफिसवर दगडफेक झाली. निरुपम यांची पोस्टर्स फाडण्यात आली
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links