जाळपोळ ते बलात्कार... गेला महिनाभर मनसे कार्यकर्त्यांचे प्रताप नियमित वाचावे लागत आहेत. राज ठाकरे यांना यामागे राजकीय षडयंत्र वाटतंय. पण ही वेळ आत्मपरीक्षणाची आहे. कारण मराठी माणूस त्यांच्याकडे आस लावून बसलाय.
.........
मुंबईतल्या म्हाडाच्या कॉलनींसारखा नाशिकचा सिडको भाग. एक जूनची गोष्ट. मध्यरात्री कोणीतरी चाळीसच्या जवळपास टू व्हीलर्स जाळल्या. काही फोर व्हीलर्सही. सिडकोवाले हादरले. टीपर गँगला पकडलं. त्यांनी सांगितलं , अण्णाच्या सांगण्यावरून ३५ हजारांच्या मोबदल्यात त्यांनी हे केलं. अण्णा म्हणजे सुहास कांदे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवाय त्यांच्या कामगार सेनेचेही पदाधिकारी. गाड्यांची चोरी आणि बँकेची रिकव्हरी , हे मुख्य काम असल्याचाही आरोप केला जातो. घरं बळकावणं वगैरे साइड बिझनेस. आधीच्या एका आरोपामुळे तडीपारी होती. ते वैतागले. पोलिसांचा बदला घ्यावा आणि तडीपारीकडे दुर्लक्ष व्हावं , म्हणून त्यांनी जाळपोळ घडवून आणली , असा कयास आहे. आता ते फरार आहेत. पोलिस त्यांना शोधताहेत. त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिलाय. पण ते अद्याप पक्षात आहे. त्यांच्या ऑफिसवर मनसेचा चौरंगी झेंडा फडकतोय.

................

गेल्याच्या गेल्या गुरुवारची गोष्ट. ज्योत्स्ना खंडागळे नावाच्या पुण्यातल्या मनसेच्या कार्यर्कत्या बाई. महिला आघाडीच्या उपाध्यक्ष असल्याचं सांगत एका शिक्षणसंस्थेकडून तीस लाख रुपयांची खंडणी मागताना त्या पकडल्या गेल्या. तेव्हा कळलं त्या भोसरी , चाकण , इंद्रायणी नगर , मोर्शी या भागात वेगवेगळ्या शिक्षणसंस्थांना ब्लॅकमेल करत जून महिनाभर फिरत होत्या. शेवटी बाबा हरगोविंदसिंग एज्युकेशन सोसायटीचे सीईओ राजेंद्र सिंग यांनी स्टिंग ऑपरेशन करत त्यांना पकडून दिलं. ऑन कॅमेरा पर्दाफाश झाल्यामुळे कुणालाच काही बोलता येणार नव्हतं. त्यांनी खंडणी म्हणून मागितलेली रक्कमही मध्यमवगीर्य मराठी माणसाचे डोळे पांढरे करणारी होती , तीस लाख. ज्योत्स्नाबाईंची पक्षातून महिनाभर आधीच हकालपट्टी करण्यात आल्याचं पक्षातून सांगण्यात आलं. पण ते फारसं कुणी मनावर घेतलं नाही.

हाजी अराफात शेख. पक्षाचे उपाध्यक्ष. एसटी कर्मचारी संघटनेचेही पदाधिकारी. राज यांच्या नेतृत्वातील जुन्या विद्याथीर् सेनेतही अनेक पदं भूषवलेली. गेल्याच महिन्यात कुर्ल्यातल्या एका व्यापा-याचे पावणे पाच लाख जबरदस्तीने पळवून नेले. मारहाण केली. तो व्यापारी त्याचा शेजारीच होता. अशा बातम्या टीव्हीवर झळकल्या. अराफत सांगतात , केस मागे घेतलीय. पोलिस म्हणतात , तपास सुरू आहे.

गोष्ट बीडची. पक्षाच्या वरिष्ठ पदावर असलेले प्रकाश महाजन. ते आणि बीड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख कर्णबाळा दुनबळे यांचे काही मतभेद. पण त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी मीडियाच्या साक्षीने आपल्यापेक्षा वयाने , पदाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असणा-या प्रकाश महाजनांना मारहाण केली. महाजनांची पक्षातून हकालपट्टी झालीय आणि दुनबळंेची फक्त पदांवरून. जे संपर्कप्रमुखपद आधीच रद्द झालं होतं.

या सगळ्यावर वरताण म्हणून गेल्या शनिवारी अंधेरीत एमआयडीसी भागात घरकाम करणारी तेरा वर्षांची एक गरीब मुलगी. चौघांनी तिचे अपहरण करून सामुहिक बलात्कार केला. आरोपी पकडले गेले , गणेश भटकल , गणेश काळे , उमेश बोराडे आणि नरंेद साळुंखे. चौघेही मनसेचे कार्यकतेर् होते. भटकल तर जनहित कक्षाचे शाखाध्यक्ष. टीव्हीवाल्यांनी चौघांपैकी दोघांची नावे मनसेच्या फलकांवर कशी झळकत आहेत , हे साग्रसंगीत दाखवलं. नंतर मनसेच्या प्रवक्त्यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं सांगितलं , मोक्का लावण्याची मागणी केली. पण गुरुवारी अंधेरीच्या कोर्टात आरोपींचं स्वागत करायला मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकतेर् हजर होते. अगदी गाडीतून घेऊन जाताना टाटा करणं आणि बिस्लेरी देणं वगैरे सोपस्कार करेपर्यंत.

ही काही उदाहरणं. गेल्या महिनाभरातलीच. मनसेचे अंधेरीचे विभागाध्यक्ष मनीष धुरी यांच्याविरुद्ध एक्स्टॉर्शनच्या दोन केस आहेत. बिल्डरांच्या पिंपात उंदिर बरेच मेलेले. पण पूर्व उपनगरातल्या एका नगरसेवकाने आपल्याच एका पदाधिका-याचाच फ्लॅट हडप केल्याचं प्रकरण अचंब्यात पाडणारं. जळगावात मनसे कार्यर्कत्यांनाच पदाधिका-याविरुद्ध मोर्चा काढण्याची पाळी आली. शिवाजी पार्कच्या ज्ञानेश्वर मंदिराच्या प्रकरणात तर थेट वरचे हात. भय्यांवरचे हल्ले आणि नंतर लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर पदाधिका-यांच्या गाड्यांची मॉडेल सुधारत गेली. आधी राज यांनी मनसेच्या कामगार युनियनची कार्यकारिणी बरखास्त केली , तेव्हा या बजबजपुरीची अप्रत्यक्ष कबुलीच दिली. नंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी असलेलं संपर्कप्रमुखपद तडकाफडकी रद्द केलं , तेव्हा त्यावर शिक्कामोर्तबच झालं.

फक्त मनसेत असं होत नाही. तिथेही हे असेच प्रकार घडत असतात. म्हणून फक्त मनसेवर आक्षेप घेण्यात अर्थ नाही. पण आक्षेप राज यांच्या याविषयीच्या प्रतिक्रियेला आहे. मंगळवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शाखाध्यक्षांचा मेळावा पार पडला. त्यात त्यांनी एकामागून एक उघड होणारं प्रकरण हे षडयंत्र असल्याचा आरोप केला. निवडणुकीच्या तांेडावर मनसेला जाणूनबुजून बदनाम केलं जात आहे , असं ते म्हणाले. हे अधिक धक्कादायक आहे. अशी कृत्य करणा-या बदमाशांना ठाकरेस्टायलीत फाशीवर चढवायच्या गोष्टी करायचं आणि आत्मपरीक्षण करायचं सोडून त्यांना अप्रत्यक्ष पाठिशी घालण्याचाच हा प्रकार होता. असे कार्यकतेर् सगळ्याच पक्षात असतात , असं लोकांनी म्हणायचं असतं. नेत्यांनी नाही.

सर्वाधिक वाईट तर अंधेरीच्या बलात्काराच्या प्रकरणाविषयीचं राज यांचं वक्तव्य... ‘ इथे महिला सुरक्षित नाहीत , कार्यकर्ते बलात्कार करतात , असे काहीजण म्हणतात. बलात्कार करा , असा मी काही पक्षादेश काढलेला नाही. एखाद्या कार्यर्कत्याचे डोके फिरले आणि त्याने बलात्कार केला , तर कुठलाच पक्ष काहीच करू शकत नाही. ’ त्याआधी नाशिकच्या सुहास कांदे प्रकरणातलं त्यांचं वक्तव्यही असंच. ‘ हा राजकीय बळी केलेला आहे. गुन्हे सिद्ध व्हायला हवेत. नंतर काय कारवाई करायची ते ठरवू. ’ लोकसभेत मनसेला भरभरून मतदान करणा-या सिडकोतल्या मतदारांनी कांदेनवमी अगदी जवळून अनुभवली होती. त्यांच्या जखमेवर हे मीठ चोळणं होतं.

पक्षाचा पाया निरपेक्ष कार्यकर्ते घालतात. भाजप , काँग्रेस , शिवसेना अथवा राष्ट्रवादीचा मूळ पक्ष असलेला समाजवादी काँग्रेस , सगळीकडे एका पैशाचीही अपेक्षा न ठेवता राबणारे हजारो कार्यकतेर् होते. आता तशातलं कार्यकर्तापणच संपलंय. आजही नव्या पक्षाला , विशेषत: नवनिर्माणाची भाषा करणा-या पक्षाला त्याची आवश्यकता आहे. पण पक्षस्थापनेनंतर दोनतीन वर्षांतच गाड्या उडवत आणि खंडणी मागत उंडारणारे कार्यकतेर् असा पाया घालू शकत नाहीत. अन्य ठिकाणी थारा न मिळालेले गुंड अशा पक्षात वळचणीला येत असतील , तर मिळवलीच.

हे राज यांनाही ठाऊक होतंच. म्हणूनच तुम्ही माझ्यासोबत आहात याचा तुमच्या आईवडिलांना अभिमान वाटला पाहिजे , असं त्यांनी म्हटलं होतं. टिळे लावू नका , दाढ्या वाढवू नका , वरची बटणं बंद ठेवा , लोकांना नम्रपणे भेटा , रोज दोनतरी पेपर वाचा असं प्रबोधन करत ते नवनिर्माणाची गाठ बांधत होते. पण पालिका निवडणुकीत तोंडघशी पडल्यानंतर त्यांनी लोकप्रियतेच्या शॉर्टकटने जाणं पसंत केलं. त्या इतरांसाठी खड्डा खणण्याच्या घाईतून हा भस्मासूर उभा राहिलाय. नेते पक्षाची लक्तरं काढत पक्षातून दुरावत चालले आहेत. लोकसभेत एवढं मोठं यश मिळवल्यानंतरही कार्यर्कत्यांकडे कोणताच ठोस कार्यक्रम नाही. काय करायचं त्यांनी ?

तरीही राज ठाकरेंच्या करिश्म्यावर सगळ्यांचाच विश्वास आहे. निवडणुकीच्या दीडदोन महिने आधी ते व्यवस्थित पुन्हा चचेर्त येऊ लागतील. त्यांचे तुफानी दौरे सगळं वातावरण बदलून टाकतील. सज्जन , सुशिक्षित , गोरेगोमटे उमेदवार नम्रपणे लोकांसमोर जातील. आपण मराठी माणसं मराठीच्या नावावर पुन्हा एकदा आपल्या सगळ्या लॉयल्ट्या विसरून त्यांना मतं देऊ. राजसाहेबांकडून मोठमोठ्या अपेक्षा ठेवू. पुन्हा मनसेला धो धो मतं पडतील. नंतर अनेक पक्षात अनेक सडके कांदे दिसायला लागतील. बलात्कार करणा - यांना ठंडा पुरणारे कार्यकर्ते वाढतील. राज यांचा पक्षही , अनेक पक्षांपैकी एक अशी त्याची हळुहळू ओळख होऊ लागेल आणि मराठी माणूस भ्रमनिरास होऊन पर्यायाचा शोध घेऊ लागेल. हे राज ठाकरे टाळू शकतील का - सचिन परब
5 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links