भरमसाठ वीज दरवाढ करणाऱ्या 'रिलायन्स एनजीर्'ला ग्राहक पुरता धडा शिकवू शकतात. ग्राहकांना पसंतीच्या कंपनीची सेवा घेण्याचा कायद्याने अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी 'टाटा पॉवर'च्या स्वस्त विजेचा पर्याय निवडावा, असे आवाहन ग्राहक पंचायतीने मुंबईकरांना केले आहे!
वीज ग्राहकांना त्यांच्या पसंतीची सेवा घेण्याचा अधिकार असून, टाटा पॉवर मुंबई व उपनगरांतील ग्राहकांना वीजपुरवठा करू शकते, असे सुप्रीम कोर्टाने जुलै २००८मध्ये दिलेल्या निकालात म्हटले आहे. शिवाय, टाटा पॉवरने त्यांच्या वीजपुरवठा यंत्रणेबाबत व्यापक प्रसिद्धी द्यावी, असे राज्य नियामक आयोगानेेही सुचवले आहे! सध्या रिलायन्स एनजीर्चे २७ लाख इतके ग्राहक असून त्यात झोपडपट्टीतील ग्राहकांची संख्या दहा लाख आहे तर, टाटा पॉवरचे ग्राहक २२ हजार आहेत.
'एमईआरसी'च्या नियमानुसार, टाटा पॉवरला जर नव्या ग्राहकांना वीजपुरवठा द्यायचा असेल तर, त्यासाठी त्यांना स्वत:ची यंत्रणाही उभारण्याची गरज नसून रिलायन्सकडून त्यांना ती तात्पुरती घेता येईल, असे ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष शिरीष देशपांडे यांचे म्हणणे आहे. अर्थात, त्यासाठीच्या खर्चाचा भार ग्राहकांना सहन करावा लागेल. मात्र, तो वीजदराच्या तुलनेत कमी असेल, असे पंचायतीचे म्हणणे आहे. ग्राहक सोसायट्या आणि हौसिंग कॉम्प्लेक्स यांनी एकत्रितपणे टाटा पॉवरकडे जाण्याचा निर्णय घेतला तर, रिलायन्सला ग्राहकांपुढे झुकावे लागेल. त्यासाठी ग्राहक पंचायत मोहीम हाती घेणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली. संपर्क: २६२८१८३२.
हे शक्य होईल?
वीज कायद्यातील सध्याच्या तरतुदीनुसार एक मेगावॉटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीज पुरवठादार निवडण्याचा अधिकार आहे. त्यापेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांना तसे करता येणार नाही.
दरांतला फरक...
'रिलायन्स', 'टाटा' आणि 'बेस्ट' या तीन कंपन्यांच्या विजेच्या दराचा तपशील. पहिल्या शंभर युनिटसाठी २.९० रुपये (रिलायन्स), १.३० रुपये (टाटा पॉवर) आणि १.८० रुपये (बेस्ट) असा आहे.
2 Comments Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
How to change the connection .. any idea?
but can we change connection individually .....