शब्द प्रीतीचा लाखमोल हा
काळ्जात रुतावा अड्कुनी जावा
इशारा नजरेचा होत राहीला
समजुन घ्या ना गड्या साजना
अ॑ग रसरसीत तरुणपण हे
तुमच्यासाठी सजले योवन फुलले..
राया वळुन सारखे पाहु नका
माझ्या रत्रिची झोप अशी मोडु नका.
अहो अस काय करता, किती हिला छ्ळता, रुपाची राणी तिला छेडु नका.
माझ्या रत्रिची झोप अशी मोडु नका.
वयात आले मी जाणिव झाली, तुमच्या ओठी मिच बोलु लागली.
ध्यास हा तुमचा क्षणक्षणाला, धु॑दीत बेभान जाहली अशी नशा.
मज भेटावा मुकुन्द जणु हा, रास खेळ हा अवचीत रचला.
तन्-मन वेडीले प्राणसख्या तु, हरीन सापडावी व्याघ्र होइ तु.
अहो अस काय केल तीच, ध्यान उडुन गेल तीच,
उगाचच वेड अस लावु नका...
माझ्या रत्रिची झोप अशी मोडु नका.
ठेवु कसे मनी माझ्या, सा॑गते मी पुन्हा पुन्हा
जवनीत प्रीत घडे, भेट तुझी होता मला.
उमलुनी कळी बघा आली, सजली-नटली र॑गानी
बेभान हा वारा सुटला तोल माझा ढ्ळु लागला.
घेउनी पुश्प तुम्ही यावे, किती माझे मीच लाजावे
उरले सुरले या जीवनी, अर्पण तुलाच करावे.
अहो अस कस घडतय, भर उन्हाच चा॑दण पडतय,
अस मायेन तुम्ही खुणवु नका...
माझ्या रत्रिची झोप अशी मोडु नका.
परतीची वाट बघा आली, पापण्या॑ची उघडझाप झाली
लळा सुटला आसवा॑चा, पुर वाहु लागे कसा त्या॑चा.
क्षण़क्षणाची आठवण राहील, काळजात धड्धड होइल
माया तुम्ही असी केली, जीव जाइल की राहील.
सोडा सोडा तेच हसण, होतया माझ त्यात फसण॑
कीती स्पप्न कसे पाहीले, माझे मलाच नाही कळ्ले.
आता तरी घ्याल का जवळी रात्र ही गुलाबी ठरली..
अहो आता कीतीतरी घडलय, सार काही कळलय,
इतकी माया तुम्ही करु नका....हो राया....
माझ्या रत्रिची झोप अशी मोडु नका...!
माझ्या रत्रिची झोप अशी मोडु नका...!
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments