बोक्या सातबंडेच्या प्रकरणानंतर जर अजूनही काही साहित्यचोरांना असं वाटत असेल की अशा प्रकारे त्यांचं नाव इंटरनेटवर जाहिर केल्याने त्यांना काही फरक पडत नाही. नवी ओळख तयार करून त्यांना आपले जुनेच उद्योग सुरू ठेवता येतील, तर त्यांनी वेळीच सावध झालेलं बरं. निरनिराळ्या ब्लॉग्स व साईट्सवरून माहितीपूर्ण लेखांची चोरी करायची आणि स्वत:चा असा आगळावेगळा ब्लॉग किंवा साईट तयार करण्याचं त्यांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. उलट तुरूंगाची हवा खावी लागेल.

अॅंड. सारंग खाडिलकर यांच्याकडून ब्लॉगर्ससाठी कॉपीराईट संदर्भात अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त माहिती मिळवली. अॅीड. खाडिलकर हे कॉपीराईट तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडून मिळालेली सर्व माहिती श्री. थिटे यांनी मला ईमेल करून पाठवली, ती मी इथे सर्व ब्लॉगर्ससाठी जशीच्या तशी देत आहे. साहित्यचोरांनीदेखील यावरून आपली नजर फिरवून योग्य तो बोध घ्यावा:
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links