बोक्या सातबंडे - सुप्रसिद्ध अभिनेते व लेखक श्री. दिलीप प्रभावळकर यांच्या मानसपुत्राचं हे नाव . बोक्या सातबंडे म्हणजे लहान मुलांच्या गोजि-या विश्वातला हिरो. त्याच्या गोष्टींतून लहान मुलांना सकारात्मक प्रेरणा मिळते. पण हेच नाव धारण करून एक भामटा मराठी ब्लॉग जगतातील लेखाकांसाठी उपद्रव ठरला आहे. या तोतया... हो, मी या भामट्याला तोतयाच म्हणते कारण लहान मुलांच्या विश्वातील हिरो बोक्या सातबंडे हा काल्पनिक असला तरी त्याच्यामुळे मिळणारे सुसंस्कार खरे आहेत आणि या भामट्याकडून जर कुणाला काही शिकायला मिळणार असेल, तर ते विघातकच असेल.
या तोतया बोक्या सातबंडेची स्वत:ची एक साईट आहे - http://www.bokyasatbande.com नावाची. स्वत:ला धड दोन ओळीही लिहिता येत नसाव्यात म्हणूनच मराठी ब्लॉगर्सचे लेख हा चोरून आपल्या साईटवर टाकतो. याला प्रतिक्रिया द्या, विनंती करा, काही फरक पडत नाही. उलट बेशरमपणे हा आणखी चो-या करतो. बरं, ही एकच साईट आहे याची असं नाही. ब-याच साईट्स, ब्लॉग्स, गुगलग्रुप्स आणि याहूग्रुप्सही आहेत याचे पण उद्योग एकच - साहित्यचोरी!
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments