कोकणातील संगमेश्वर तालुक्यात देवरूख नावाचे एक गाव आहे. तिथून सुमारे १२ कि.मी.वर देवघर नावाचे एक खेडेगाव आहें. नुकतीच त्या गावाला भेट देण्याची संधी मिळाली आणि माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. पाटाचे पाणी, नारळ-पोफळीच्या बागा, पर्‍या म्हणजे लहान नदीवजा ओढा,त्या पर्‍यात मोठमोठे अजस्त्र दगड, वानरांच्या टोळ्यांचा झाडांच्या फांद्यांवरून चाललेला दंगा, आंब्या फणसांनी लगडलेली साठ सत्तर वर्षांची झाडे अशा सौंदर्याने नटलेला परिसर आणि त्याच्या मध्यभागी सुमारे शंभर वर्षांहून अधिक वय असलेले, ओटी, पडवी, माडी, बाळंतिणीची खोली, माजघर, देवघर अशा साग्रसंगीत नेपथ्याने नटलेले आजोबांचे घर !!!
तेथे राहणारे श्री.गिरीश विठ्ठल बोंद्रे आजही त्या घराची परंपरा भक्तिभावाने जपत असतात. त्यांचे आदरातिथ्य स्वीकारताना आम्हाला अमृताची चव चाखतोय असेच वाटत होते. त्यांच्या कडे अत्यंत वाजवी शुल्कात राहण्या साठी खोल्या मिळतात. दोन चार दिवस मुक्काम करून प्रत्यक्ष अनुभव घेतल्या शिवाय खरेच वाटणार नाही. म्हणून म्हणतो अवश्य जाच!! त्यांचा फोन. नं- ०२३५४-२४९६१७ मु.पो.देवघर, ता.संगमेश्वर , जि. रत्नागिरी.
1 Comment   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links