पाक-निर्मित बनावट नोटांचे प्रकरण


नवी दिल्ली, ५ ऑगस्ट (प्रे.ट्र.) - भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत करण्यासाठी पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर बनावट भारतीय नोटा बाजारपेठेत आणायला सुरुवात केली आहे. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने नोटा छापण्यासाठी वापरायचा कागद आणि शाई यांत परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे.

(समस्येच्या मुळात जाऊन उपाय काढण्याऐवजी अर्थात बनावट नोटा निर्माण करणार्‍या पाकवर कारवाई करण्याऐवजी वरवरचे उपाय योजणारे केंद्रातील काँग्रेसचे शासन वैचारिक क्रांती अपरिहार्य करत ! - संपादक)सध्या नोटा छापण्यासाठी स्वित्झर्लंडची एक कंपनी भारताला शाई पुरवते, तर युरोपच्या सहा कंपन्या कागद पुरवतात. (गेल्या ६२ वर्षांत भारतीय चलन तयार करण्यासाठी लागणारा कागद आणि शाई यांचे उत्पादन करण्यात भारत स्वावलंबी न होणे, ही भारतीय लोकशाहीची अधोगती ! - संपादक) याच कंपन्यांकडून तसाच माल पाकिस्तानलाही मिळत असल्यामुळे बनावट भारतीय नोटा तयार करणे पाकला जमत आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी भारताला नोटा छापण्यासाठी पुरवला जाणारा कच्चा माल पाकला पुरवणार नाही, असे आश्‍वासन देणार्‍या कंपनीकडूनच कागद आणि शाई यांची खरेदी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. (गेली अनेक दशके देशाची अर्थव्यवस्था डळमळीत करण्याचे षड्यंत्र चालू असतांना हे का लक्षात आले नाही ? याला उत्तरदायी असणार्‍या राज्यकर्त्यांवर राष्ट्रप्रेमींचे शासन आल्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला भरण्यात येईल ! - संपादक) या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती नोटा छापण्याचा कागद आणि शाई पुरवणार्‍या कंपन्या तसेच युरोपीय देशांचे शासन यांच्याशी चर्चा करणार आहे.


निगडीत वृत्त : भारताचे ढिसाळ आर्थिक धोरण

संरक्षणखर्चात वाढ : 2009-02-17
राज्यातील वीजटंचाईवर प्रत्येक अधिवेशनात दीर्घकालीन उपाययोजनांचेच पालुपद - पांडुरंग फुंडकर : 2008-07-23
महागाईचा ४५ महिन्यांतील उच्चांक : 2008-06-14
चलनवाढीचा दर ८.२४ टक्क्यांवर : 2008-06-07
शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे सरकारवर टीकास्त्र ! : 2008-06-05
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links