Marathi chitrapat duniyetil Madhubala ashi jayanchi olakh hoti tya Jeshta abhinetari Jayashree Gadkar yanche aaj Nidhan zhale.

जेष्ठ चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचे शुक्रवारी पहाटे मुंबईत निधन झालं. त्या ६६ वर्षाच्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेल्या गडकर यांचं शुक्रवारी पहाटे ३ वाजता हृद्यविकाराने निधन झाले.

साठ आणि सत्तरच्या दशकात मराठी चित्रपटात जयश्री गडकर यांच्या भूमिका गाजल्या होत्या. आतापर्यंत त्यांनी मराठी,हिंदी आणि इतर भाषांमधल्या २५० चित्रपटांमध्ये काम केले होते.

मनिनी ’, ‘ वैजयंता ’, ‘ सवाल माझा ऐका ’ आणि ‘ साधी माणसं ’ या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते .

१९५६ ला ‘ दिसतं तसं नसते ’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं . जयश्री गडकर यांनी आपल्या कारकिर्दीत अडीचशेहून अधिक मराठी , हिंदी आणि विविध प्रादेशिक भाषांतील चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत .

हंसा वाडकर यांच्यानंतर तमाशा - लावणीपटात त्यांची जागा कोण भरून काढेल आणि सोज्वळ , सात्विक भूमिका करणा - या सुलोचनाबाईंच्या जागी कोणाला घ्यावं , या प्रश् ‍ नांना जयश्री गडकर यांनी आपल्या चतुरस्त्र आणि कसदार अभिनयाने उत्तर दिलं .
2 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links