अजमल कसाबची केस लढवणा-या वकिल अंजली वाघमारे यांच्या वरळी येथील घरावर ऐन मध्यरात्री शिवसैनिकांनी हल्ला चढवला. शिवसैनिकांचा संताप पाहून कसाबची केस लढवणार नाही असे आश्वासन अंजली वाघमारे यांनी दिले.

शिवसैनिकांचा हा रूद्रावतार पाहून अंजली वाघमारे भांबावून गेल्या. कसाबची केस आपण लढणार नाही असे लेखी आश्वासन त्यांच्याकडून शिवसैनिकांनी लिहून घेतले. जनतेच्या संतप्त भावना लक्षात घेऊन कसाबची केस न लढवण्याचा निर्णय आपण घेत आहोत असे वाघमारे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान वरळी पोलिसांची कुमक वाघमारे यांच्या घरी पोहोचली असून त्यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात आले आहे. यापूर्वीही कसाबचे वकीलपत्र घेऊ इच्छिणा-या अन्य दोन वकिलांनाही शिवसैनिकांच्या रोषाचे धनी व्हावे लागले होते.
5 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links