प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. नितू मांडके यांच्या प्रेरणेतून अंधेरी येथे सुरू करण्यात आलेल्या हॉस्पिटलला अनिल अंबानी यांच्या आईचे नाव देण्यात आले. डॉक्टरांच्या पश्चात हॉस्पिटल व्हावे म्हणून धडपड करणा-या डॉ. अलका मांडके यांना उद्घाटनाच्यावेळी स्टेजवर बसण्याचा मान मिळाला नाही. तिथे अंबानी कुटुंब स्थानापन्न झाले होते.

मुंबईत ह्रदय रोगावर उपचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल सुरू करण्याचे स्वप्न डॉ. मांडके यांनी पाहिले होते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते रात्रंदिवस काम करत होते. स्वतःच्या शरीरावर पडणा-या ताणाकडे दुर्लक्ष करुन सतत ऑपरेशन करायची आणि त्यातून मिळणारा पैसा हॉस्पिटलसाठी खर्च करायचे असे सुरू होते. त्यातून अतिरिक्त ताण आला आणि ह्रदयविकाराचा तीव्र झटक्याने डॉक्टरांचे निधन झाले.
3 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links