कोरेगाव पार्क भागात असलेल्या जर्मन बेकरीमध्ये बॉम्ब स्फोट होऊन १० जण ठार तर ४० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे गृह सचिव पिल्लई यांनी स्पष्ट केले आहे. जखमींमध्ये अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

सायंकाळी पावणे आठच्या सुमारास झालेला हा स्फोट सुरवातीला सिलेंडरचा असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, स्फोटाची तीव्रता आणि स्फोटासाठी वापरलेल्या साहित्याची पाहणी केल्यानंतर हा बॉम्ब स्फोट असल्याचे एटीएसतर्फे स्पष्ट करण्यात आले. प्रथमदर्शनी हा बॉम्ब स्फोट असून या मागे कोणती संघटना आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र सोनावणे यांनी सांगितले.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links