बेस्टच्या डेपोतून डबलडेकर आणि सिंगल डेकर बस सुटण्याऐवजी डेपोतून हॅलिकॉप्टर हवेत झेपावताना दिसले तर, मुंबईकरांनो आश्चर्य वाटू देऊ नका कारण, बेस्टच्या डेपोतून हेलिकॉप्टर लँडिंग आणि टेकऑफ करण्याची योजना तयार झाली आहे. बारा जानेवारीला धारावी डेपोत हेलिकॉप्टर लँडिंगचा 'प्रयोग' यशस्वी झाला आहे.
मुंबईतील हवाई वाहतुकीला आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी 'ग्लोबल फ्लाईंग क्लब'ने हा प्रस्ताव बेस्टला सादर केला आहे. बेस्टच्या सर्व डेपोंमध्ये दहा वर्षांच्या करारावर हेलिपॅड उभारण्याची परवानगी मागितली आहे. कुलाब्यातील बॅकबे डेपोच्या जागेला सर्वाधिक पसंती दिली आहे.
त्यासाठी दर महिन्याला पन्नास हजार रुपये, त्याशिवाय लँडिंग सुविधा देण्यासाठी दरमहा पाच हजार रुपये, एका तासापेक्षा अधिक काळ हेलिकॉप्टर डेपोमध्ये उभे राहिल्यास प्रत्येक तासाला पाचशे रुपये भाडे देण्याची कंपनीची तयारी आहे.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments